हैदराबाद: काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माता अभिषेक अग्रवाल आता त्यांच्या आगामी द व्हॅक्सिन वॉर या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आणि विवेक अग्निहोत्रीची पत्नी पल्लवी जोशी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
युनिटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये शूटिंग करताना द व्हॅक्सिन वॉरच्या सेटवर अभिनेत्रीला दुखापत झाली. ठिकाणावरील सूत्रांनी सांगितले की एका वाहनाने नियंत्रण गमावले आणि अभिनेत्री पल्लालवी धडक दिली. दुखापत असूनही, तिने तिचा शॉट पूर्ण केला आणि नंतर ती स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी गेली.सध्या तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.
पल्लवी जोशी द व्हॅक्सिन वॉर चित्रपटात अभिनय करत असली तरी ती या चित्रपटाची निर्मातीदेखील आहे. या चित्रपटात ती एका भारतीय शास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान लस विकसित करण्यासाठी दोन वर्षांपासून रात्रंदिवस कष्ट घेतले अशा शास्त्रज्ञांची वेगळी भूमिका ती पडद्यावर साकारत आहे. निर्मात्यांनुसार, कथा सत्य घटनांवर आणि अत्यंत महत्त्वाच्या लोकांवर आधारित आहे, ज्यामुळे विवेक रंजन अग्निहोत्री पात्रांसाठी एक प्रमुख स्टार कास्ट सध्यातरी उघड करण्यात आलेली नाहीत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
11 भाषांमध्ये रिलीज होईल 'द व्हॅक्सिन वॉर' - विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त द व्हॅक्सिन वॉर या त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'लस युद्धाची ओळख करून देत आहे, भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय सत्य कथा स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट 2023 निमित्त रिलीज होईल. 11 भाषांमध्ये, कृपया आम्हाला आशीर्वाद द्या.
हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड व्यतिरिक्त हा चित्रपट मराठी, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत प्रदर्शित होणार आहे. एवढीच माहिती विवेकने नव्या चित्रपटाबाबत शेअर केली आहे. या चित्रपटात कोण मुख्य भूमिकेत असणार आहे याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक स्वतः करत आहे.
कोविडमुळे अनाथ झालेल्याच्या पुनर्वसनासाठी अग्नीहोत्री दांपत्याचा पुढाकार - अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे यजमान विवेक रंजन अग्निहोत्री नेहमीच समाजोपयोगी कामं करताना दिसतात. त्यांची सामाजिक बांधिलकी त्यांच्या चित्रपटांतूनही ओथंबून वहात असते. सध्या कोरोना ने कहर माजविला असून अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यातच काही बालकांचे दोन्ही पालक कोविडच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेले ते परत आलेच नाहीत. समाजात कोरोनामुळे उद्भवलेल्या अनेक समस्यांवर चर्चा होताना दिसते परंतु कोविड मुळे आई वडील गमावलेल्या अनाथ मुलांच्या समस्येकडे फारसे लक्ष दिले जात नाहीये. कोरोनाच्या तडाख्यात सापडलेल्या पीडित कुटुंबांना आणि कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी अग्निहोत्री पति-पत्नी पुढे सरसावले आहेत.
या कोरोनाच्या कठीण काळात एखादी लहानशी मदतही हजारो लोकांचे प्राण वाचवू शकते. पल्लवी जोशी आणि विवेक रंजन अग्निहोत्री सध्या कोविड मुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना आणि अनाथ मुलांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यासाठी या जोडप्याने महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या भारतीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) बरोबर करार केला आहे.
हेही वाचा - Gina Lollobrigida: 20 व्या शतकातील मोनालिसा जीना लोलोब्रिगिडा यांचे 95 व्या वर्षी निधन