हैदराबाद - Interesting facts about Salar : प्रभासचे चाहते आणि चित्रपट रसिक काही तासानंतर चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या 'सालार' चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. 'सालार' हा चित्रपट जगभर मोठ्या अपेक्षांसह प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने जाणून घेऊया त्या प्रोजेक्टबद्दलच्या काही रंजक गोष्टी
-
THE MASS IS HERE 🔥💥#Salaar Advance tickets booked (Approx.) in India as of 11:59 PM on 20-Dec-2023 for the first day (22-Dec-2023), excluding National Chain Multiplexes (PVR, INOX, Cinepolis):
— Salaar (@SalaarTheSaga) December 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
•Andhra Pradesh: 13.25 Lakhs
•Nizam (Telangana): 6 Lakhs
•North India: 5.25… pic.twitter.com/uXNkwDtoGa
">THE MASS IS HERE 🔥💥#Salaar Advance tickets booked (Approx.) in India as of 11:59 PM on 20-Dec-2023 for the first day (22-Dec-2023), excluding National Chain Multiplexes (PVR, INOX, Cinepolis):
— Salaar (@SalaarTheSaga) December 21, 2023
•Andhra Pradesh: 13.25 Lakhs
•Nizam (Telangana): 6 Lakhs
•North India: 5.25… pic.twitter.com/uXNkwDtoGaTHE MASS IS HERE 🔥💥#Salaar Advance tickets booked (Approx.) in India as of 11:59 PM on 20-Dec-2023 for the first day (22-Dec-2023), excluding National Chain Multiplexes (PVR, INOX, Cinepolis):
— Salaar (@SalaarTheSaga) December 21, 2023
•Andhra Pradesh: 13.25 Lakhs
•Nizam (Telangana): 6 Lakhs
•North India: 5.25… pic.twitter.com/uXNkwDtoGa
'सालार'च्या कथानकाची जुळणी सुमारे 15 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. प्रशांत नील तेव्हा दिग्दर्शक नव्हता. एवढी मोठी कथा दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात सांगण्यासाठी बजेटच्या मर्यादा होणार हे त्याला दिग्दर्शक म्हणून माहिती होतं. त्यामुळेच काही चित्रपटांच्या शूटिंगनंतर प्रेक्षकांना 'सालार'च्या दुनियेची ओळख करून द्यायची तयारी त्यानं ठेवली होती.
प्रशांत नील यानं दिग्दर्शक म्हणून 'उग्राम' हा पहिला चित्रपट केला. कन्नडमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे नंतर इतर भाषातही रिलीज झाले. दिग्दर्शनातले आपलं कौशल्य त्यानं या पहिल्याच लक्षवेधी चित्रपटातून सिद्ध केलं. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर 'केजीएफ' चित्रट बनवून त्याचे दोन्ही भाग त्याने दिग्दर्शित केले. विशेष म्हणजे त्याच्या सर्वच चित्रपटाचं लेखनही प्रशांत नील स्वतःच करतो. 'केजीएफ'च्या यशानंतर त्यांनी 15 वर्षापूर्वी लिहिलेल्या 'सालार'च्या कथानकावर काम सुरू करण्याचे ठरवले. 'सालार' हा प्रशांत नील यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
-
#Salaar takes the USA by storm with record-breaking Premiere pre-sales of $1.81 MILLION, making it the top USA Premiere Grosser for any Indian film in 2023 👊💥#SalaarTakeOverUSA #SalaarCeaseFire#Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @VKiragandur @hombalefilms… pic.twitter.com/GcJ8ozPmi6
— Salaar (@SalaarTheSaga) December 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Salaar takes the USA by storm with record-breaking Premiere pre-sales of $1.81 MILLION, making it the top USA Premiere Grosser for any Indian film in 2023 👊💥#SalaarTakeOverUSA #SalaarCeaseFire#Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @VKiragandur @hombalefilms… pic.twitter.com/GcJ8ozPmi6
— Salaar (@SalaarTheSaga) December 21, 2023#Salaar takes the USA by storm with record-breaking Premiere pre-sales of $1.81 MILLION, making it the top USA Premiere Grosser for any Indian film in 2023 👊💥#SalaarTakeOverUSA #SalaarCeaseFire#Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @VKiragandur @hombalefilms… pic.twitter.com/GcJ8ozPmi6
— Salaar (@SalaarTheSaga) December 21, 2023
'सालार' चित्रपटासाठी त्याने प्रभासची निवड केवळ पॅन इंडिया रिलीज समोर ठेवून केली नाही तर त्यांना देवा या 'सालार'च्या व्यक्तीरेखेसाठी प्रभासहून दुसरा उत्तम पर्यायी अभिनेता दुसरा कोणी वाटला नाही. नियोजित नसतानाही चित्रीकरणादरम्यान हा चित्रपट दोन भागात बनवण्याचे त्याने ठरवले.
सध्या सुरू असलेल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर प्रमोशनल व्हिडिओ रिलीझ झाले तेव्हा 'केजीएफ' आणि 'सालार' यांच्यात संबंध असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला होता. मात्र, या दोन्ही चित्रपटामध्ये कोणताही संबंध नसल्याचं दिग्दर्शकाने स्पष्ट केले. दुसरीकडे, तो म्हणाला की हा जाहिरातीप्रमाणे 'उग्राम'चा रिमेक नाही. 'केजीएफ'चा नायक यश या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून झळकणार अशी अटकळही काही लोकांनी बांधली होती.
सालार चित्रपटात प्रभास आणि श्रृती हासनवर एक गाणं चित्रीत करण्याचं प्रशांतने ठरवलं होतं. परंतु असं भावनिक गाणं कथेमध्ये आल्यामुळे चित्रपटाचा प्रवाह विस्कळीत होईल असं त्याला वाटलं. त्यामुळे त्यानं या गाण्याची कल्पना सोडून दिली. सालारमध्ये श्रुती हासन आद्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
'सालार' चित्रपटातील 'देवा' सारखेच दुसरे पात्र म्हणजे वरदराज मन्नार. या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमार याचाच विचार केला होता. प्रशांत म्हणाला की त्याच्याशिवाय 'सालार' नाही त्यामुळे पृथ्वीराजच्या कामगिरीची पातळी आपण समजू शकतो. जगपती बाबू, ईश्वरी राव, टीनू आनंद आणि इतर प्रसिद्ध अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
गोदावरीखानी तेलंगणा येथे 29 जानेवारी 2021 रोजी सालारचे शूटिंग सुरू झाले. नंतर चित्रीकरण हैदराबाद, मंगळूर आणि विशाखापट्टणम बंदर परिसरात झाले. 114 दिवसांत शूटिंग पूर्ण झाले. प्री-क्लायमॅक्समधील अॅक्शन सीनसाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च झाल्याची एक बातमी आहे. या चित्रपटातील दुसर्या एका दृश्यात नायक 1000 लोकांशी लढताना दिसणार आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे 270 कोटी रुपये इतके आहे.
अश्लीलता नसतानाही काही हिंसक दृश्यांमुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटाचा रनटाइम 2 तास 55 मिनिटे 19 सेकंद आहे. या वर्षाच्या पूर्वार्धात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र वेगवेगळ्या कारणाने याच्या प्रदर्शनाला विलंब झाला.
'केजीएफ'मध्ये पुरुषाची दुनिया दाखवणारा प्रशांत नील 'सालार'मधून खानसारच्या दुनियेची ओळख करून देणार आहे. दोन चांगले मित्र कट्टर शत्रू बनतात, असं याचं कथानक आहे. देवा आणि वरदराज मन्नार यांचे शत्रूत्व कशामुळे झाले? खानसरांची मूळ कथा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा -