मुंबई दिग्गज निर्माता, दिग्दर्शक आणि गीतकार सावन कुमार टाक यांच्यावर पवन हंस स्मशानात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. काल गुरुवारी संध्याकाळी त्यांचे कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले होते.
अंत्य यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या जुहूतील घरी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईक व मित्र परिवाराने त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर सजवलेल्या अॅम्बूलन्समधून त्यांचे पार्थिव स्मशानात नेण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार, तंत्रक्ज्ञ, निर्माता उपस्थित होते. सावन कुमार टाक यांच्या अंतिम संस्कारावेळी प्रेम चोप्रा, सुनील पाल, डेविड धवन, मनमोहन शेट्टी, अशोक पंडित आणि श्याम कौशल यांच्यासह अनेकांनी उपस्थित दर्शवली होती.
'हे' आहेत सावन कुमारांचे प्रसिद्ध चित्रपट : ७० ते ८० च्या दशकात सावन कुमार यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती तसेच दिग्दर्शन केले होते. यात सनम बेवफा, बेवफा से वफा, हवस, सौतन, साजन बिन सुहागन, सौतन की बेटी, खलनायिका, माँ, सलमा पे दिल आ गया, सनम हरजाई, चांद का तुकडा यासारख्या अनेक चित्रपटाचा समावेश आहे. सावन कुमार यांचे बहुतांश चित्रपट हे महिलांवर आधारित असायचे. यासाठी त्यांना खास ओळखले जात होते.
'या' कलाकारांसोबत केले काम : सावन कुमार गेल्या ३० ते ४० वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रीय होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत संजीव कुमार ते सलमान खान यासारख्या कलाकारांसोबत काम केले होते. सावन कुमार टाक यांचा नौनिहाल हा निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता. सावन कुमार टाक यांनी अभिनेत्री मीना कुमारीसोबतही काम केले होते. १९७२ यावर्षी प्रदर्शित झालेला गोमती के किनारे या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. संजीव कुमार, राजेश खन्ना, जीतेंद्र, श्रीदेवी, जया प्रदा, सलमान खान यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते.
हेही वाचा - Sawan Kumar Tak Passed Away ज्येष्ठ दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचं निधन, सलमान खानची भावूक पोस्ट