ETV Bharat / entertainment

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश 'मन कस्तुरी रे' चित्रपटातून करणार मराठीत पदार्पण - Abhinay Berde

तेजस्वी प्रकाशने (Tejasswi Prakash)सोशल मीडियावर तिचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे ( Man Kasturi Re ) चे पोस्टर शेअर केले आहे. अभिनेता अभिनय बेर्डे ( Abhinay Berde ) सोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत माने करत आहे.

तेजस्वी प्रकाशचे मराठी चित्रपटात पदार्पण

author img

By

Published : Aug 8, 2022, 12:10 PM IST

मुंबई - अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ( Tejasswi Prakash ) तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्पा एन्जॉय करत आहे. टेलिव्हिजन शोमध्ये तिच्या अभिनयाने लाखो मने जिंकणारी बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी आता तिच्या चित्रपट पदार्पणाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

सोमवारी तेजस्वीने सोशल मीडियावर तिचा पहिला मराठी चित्रपट मन 'कस्तुरी रे' ( Man Kasturi Re ) चे पोस्टर शेअर केले. या चित्रपटात ती अभिनेता अभिनय बेर्डेसोबत ( Abhinay Berde ) स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. अभिनय हा मराठीतील दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आहे.

'मन कस्तुरी रे' चे दिग्दर्शन संकेत माने ( Sanket Mane ) करत आहे. यापूर्वी त्यांनी खारी बिस्किट (2019) आणि परी हूं मैं (2018) सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. हा चित्रपट एक प्रेमकथा आहे ज्यात तेजस्वीने श्रुती नावाच्या तरुणीची भूमिका केली आहे. मुंबईवर आधारित हा चित्रपट नवीन काळातील रोमँटिक ड्रामा आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

'मन कस्तुरी रे' नंतर, तेजस्वीचा आणखी एक मराठी चित्रपट पाइपलाइनमध्ये आहे. रोहित शेट्टीची निर्मिती असलेला विहान सूर्यवंशी दिग्दर्शित दिग्दर्शित 'स्कूल कॉलेज आणि लाइफ'मध्ये अभिनेत्री तेजस्वी दिसणार आहे. या चित्रपटात तेजस्वी करण किशोर परबसोबत दिसणार आहे.

दरम्यान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी तिच्या बहुचर्चित टेलिव्हिजन शो नागिन 6 मध्ये भूमिका साकारत आहे.

हेही वाचा - Urfi Javed: उर्फी जावेद कोकिलाबेन रुग्णालयात दाखल; जेवणही तिला आवडेना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.