ETV Bharat / entertainment

IPL 2023 opening ceremony : आयपीएल उद्घाटन सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींसह थिरकणार तमन्ना भाटिया - १२ मैदानावर खेळले जाणार आयपीएल

चार वर्षानंतर पहिल्यांदाच क्रिकेटची इंडियन प्रिमियर लीग भारतात खेळली जाणार आहे. याचा उद्घाटन सोहळा 31 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाईल. याचा अंतिम सामनाही याच मैदानात पार पडेल. यंदाच्या उद्घाटन सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी सामील होणार असून तमन्ना भाटियादेखील परफॉर्मन्स करणार आहे.

IPL 2023 opening ceremony
आयपीएल उद्घाटन सोहळा
author img

By

Published : Mar 30, 2023, 10:26 AM IST

Updated : Mar 30, 2023, 1:04 PM IST

नवी दिल्ली - अभिनेत्री तमन्ना भाटिया 31 मार्च रोजी इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्यासाठी सज्ज आहे. इंडियन प्रीमियर लीगने ही बातमी ट्विटरवर जाहीर केली आणि लिहिले, 'टाटा आयपीएलच्या उद्घाटन समारंभात तमन्ना भाटियासह सामील व्हा. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सर्वात मोठा क्रिकेट महोत्सव साजरा करत आहोत! 31 मार्च 2023 रोजी स्टार स्पोर्ट्स इंडिया आणि जियो सिनेमावर संध्याकाळी ६ वाजता ट्यून इन व्हा.'

आयपीएल उद्घाटन सोहळा - 2023 चा टाटा आयपीएल सीझनचा उद्घाटन सोहळा गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. ३१ मार्च रोजी उद्घाटनाच्या सत्रात अनेक रंगारंग कार्यक्रम सादर होणार आहेत. यामध्ये अभिनेता टायगर श्रॉफ, कॅटरिना कैफ, रश्मिका मंदान्ना आणि गायक अरजित सिंग देखील यावर्षीच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत.आयपीएल 2023 ची सुरुवात शुक्रवारी 31 मार्च रोजी बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या वर्षीचा विजोता संघ गुजरात टायटन्स यांच्यातील लढतीने होणार आहे. 31 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सलामीचा सामना होईल. देशात 12 ठिकाणी यंदाचा आयपीएल खेळला जाईल आणि स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादमधील याच ठिकाणी खेळला जाईल.

१२ मैदानावर खेळले जाणार आयपीएल - मोहाली, लखनौ, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी (रॉयल्सचे दुसरे घर) आणि धर्मशाला (किंग्जचे दुसरे घर) येथे आयपीएल 2023 चे सामने होणार आहेत. 2019 नंतर प्रथमच क्रिकेटची इंडियन प्रिमियर लीग भारतात खेळली जाणार आहे. यात प्रत्येक संघ एकूण 14 सामने खेळेल. प्रत्येक संघाला घरच्या मैदानावर सात सामन्यांमध्ये खेळताना घरचा पाठिंबा असेल तर उर्वरित सात सामने ते दूरच्या ठिकाणी खेळतील. दिवसाचे सामने IST दुपारी 3:30 PM ला सुरू होणारे सामने दोन सामन्यांच्या वेळेनुसार खेळवले जातील आणि रात्रीचे सामने IST संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील.

आयपील संघांची दोन गटात विभागणी -

अ गटामध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे पाच संघ खेळतील.

  • ब गटामध्ये - चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे पाच संघ खेळतील.

हेही वाचा - Dia Mirza Interview : दिया मिर्झा म्हणते वयाच्या ४० व्या वर्षी मी बुलेट चालवायला शिकले यावर अजूनही विश्वास बसत नाही, वाचा विशेष मुलाखत

Last Updated : Mar 30, 2023, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.