मुंबई - अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे चर्चित जोडपे पुन्हा एकदा एकत्र दिसले. सोमवारी रात्री डिनर डेटनंतर दोघेही एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. कारमध्ये एकत्र बसलेल्या दोघांना पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. विजय ड्रायव्हरच्या सीटवर असताना तमन्ना त्याच्या शेजारच्या सीटवर बसली होती.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचे डेटिंग - पापाराझीने आपल्या इंस्टाग्रामवर कथित जोडप्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तमन्ना दोन-टोन ग्रे ट्राउझर्स आणि व्हाइट क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, विजय काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसला, जो त्याने ग्रे चेक शर्टसह जोडला होता. पापाराझींच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. काही युजर्सने दोघांनाही अयोग्य कपल म्हटले आहे, तर काही लोक दोघांनाही एकत्र पसंत करत आहेत. एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये 'फेवरेट वन' असे लिहिले आहे. तर दुसऱ्या चाहत्याने 'सुंदर कपल' असे लिहिले आहे. त्याचवेळी आणखी एका चाहत्याने 'जेन्युइन कपल' असे लिहिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नवीन वर्षाच्या पार्टीपासून जोडी चर्चेत - नवीन वर्षाच्या पार्टीत हे जोडपे रोमँटिक मूडमध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. फेब्रुवारीमध्ये विजयने तमन्नाचे टोपणनावही उघड केले होते. इंस्टाग्राम स्टोरीजवर तमन्नाचे आभार मानताना त्याने तिला 'टोमॅटो' म्हटले होते. दोघांचे उघडपणे भेटणे सुरू असले तरी सोशल मीडियावर त्यांनी आपल्यात फक्त मैत्री असल्याचेच भासवले आहे. दोघेही अत्यंत प्रतिभावान कलाकार आहेत. त्यामुळे दोघांचाही चाहता वर्ग मोठा असून त्यांनी एकत्र यावे असेच दोघांनाही वाटते.
तमन्ना आणि विजयचा वर्क फ्रंट - अभिनेता विजय वर्मा सध्या त्याच्या 'दहाड' या वेब सीरिजची तयारी करत आहे. या मालिकेत तो 'दबंग' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. दहाड ही वेब सिरीज 12 मे रोजी OTT वर रिलीज होईल. दरम्यान, तमन्ना भाटिया रजनीकांतसोबत 'जेलर' चित्रपटाची तयारी करत आहे.
हेही वाचा - Aryan Khan : शाहरुखच्या मुलाने सुरू केला कपड्यांचा व्यवसाय; वडिलांना करण्यास सांगितले अॅक्शन कट