ETV Bharat / entertainment

Arijit Singh Birthday: चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा गायक अरजित सिंग - Arijit Singh Birthday

प्रसिद्ध गायक अरिजित सिंग 25 एप्रिल रोजी आपला 35 वा वाढदिवस करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या गायक होण्याच्या संघर्षाविषयी जाणून घेऊयात.

अरजित सिंग
अरजित सिंग
author img

By

Published : Apr 25, 2022, 10:56 AM IST

आपल्या सुमधुर आवाजाने आणि रोमँटिक गाण्यांनी करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग 25 एप्रिल रोजी आपला 35 वा वाढदिवस करत आहे. अरिजित सिंगला आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. अत्यंत संघर्षातून त्याने आपली कारकिर्द निर्माण केली आहे.

गायक अरिजित सिंगचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झाला. त्याचे वडील पंजाबी आणि आई बंगाली होती. कोरोनाच्या काळात मे २०२१ रोजी गायकाच्या आईचे निधन झाले.

अरिजित सिंगने 2005 मध्ये 'फेम गुरुकुल' या रिअॅलिटी शोमधून स्वतःला आजमवण्याचा प्रयत्न केला पण तो शो जिंकू शकला नाही. यानंतर गायकाने '10 के 10 ले गये दिल' या आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. या रिअॅलिटी शोमध्ये अरिजीतने अशी जादू पसरवली की, त्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री त्याच्या खूप जवळ आली.

सर्वप्रथम, अरिजितने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरिया' चित्रपटासाठी 'युं शबनमी' हे गाणे रेकॉर्ड केले. तथापि, नंतर स्क्रिप्टमध्ये काही बदल झाले ज्यामुळे हे गाणे चित्रपटातून वगळण्यात आले आणि ते पुन्हा प्रदर्शित झाले नाही. गायक होण्यापूर्वी अरिजीतने प्रीतम, शंकर-एहसान-लॉय, विशाल शेखर आणि मिथुन यांसारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केले होते.

करिअरबद्दल बोलायचे झाले तर अरिजित 'आशिकी 2' मधील गाण्यांनी असा चमकला की तो बॉलिवूडमधील गायनाचा सर्वात तेजस्वी तारा बनला. दरम्यान, अरिजीतने एकामागून एक हिट गाणी देत ​​बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावले.

इतकं स्टारडम आणि लोकप्रियता असूनही अरिजित सिंग हा अतिशय सामान्य माणूस आहे. गायक त्यांच्या साधेपणामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. अलीकडेच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो पॅंट, टी-शर्ट आणि स्लीपरमध्ये शाळेबाहेर दिसत होता.

हेही वाचा - स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी ''एकुलती एक'' श्रिया पिळगावकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.