ETV Bharat / entertainment

Swara Bhaskar Baby Girl : स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांना कन्यारत्न... - स्वरा आणि फहाद यांना कन्यारत्न प्राप्त

Swara Bhaskar Baby Girl : अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांना मुलगी झाली आहे. स्वरानं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर अनेकजण कमेंट करून तिला ट्रोल करत आहेत.

Swara Bhaskar Baby Girl
स्वरा भास्करला झाली मुलगी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 5:52 PM IST

मुंबई Swara Bhaskar Baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. आता स्वराबद्दल एक बातमी समोर येत आहे. स्वरा भास्करनं तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ती आई झाली आहे. याबद्दल खुलासा खुद्द तिनं सोशल मीडियावर केला आहे. स्वरा भास्करनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बाळासोबतचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. स्वरानं मुलीला जन्म दिला आहे. या फोटोच्या पोस्टमध्ये तिनं एक गोड कॅप्शन देखील दिलं आहे. तिनं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, एक प्रार्थना ऐकली, आशीर्वाद देण्यात आला, एक गाणे एक रहस्यमय सत्य, आमची मुलगी राबिया हिचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. हे पूर्णपणे नवीन जग आहे... तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद'.

राबियाच्या नावाचा अर्थ आहे खूप खास : स्वरा आणि तिचा राजकारणी पती फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचं नाव राबिया ठेवले आहे. तिनं आपल्या मुलीचं नाव एका सुफी संताच्या नावावर ठेवलं आहे. राबिया बसरी इराकमधील एक सुफी संत होत्या, ज्यांना इराकमधील पहिल्या महिला सुफी संत अशी मान्यता आहे. राबिया बसरी या एक अतिशय बलवान महिला होत्या. राबिया यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि प्रार्थनेत घालवले. फोटोमध्ये स्वरा भास्कर आणि फहाद हे खूप आनंदी दिसत आहेत. स्वरानं हॉस्पिटल मधील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिनं तिच्या लहान बाळाला छातीजवळ धरलं आहे. दरम्यान आता काहीजण तिच्या पोस्टवर सातत्यानं टीका करत आहेत, तर काहीजण या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.

ट्रोल झाली स्वरा भास्कर : या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्यानं लिहिलं, 'नाव पण स्वत:च्या इच्छानुसार ठेवलं की नाही'. दुसऱ्या एकानं लिहिलं, 'मुलगी हिला आई म्हणेल की पप्पा यात देखील कंफ्यूजन आहे' तर आणखी एकानं लिहिलं, 'रेबिज नाव ठेवायला पाहिजे होतं'. अशा कमेंट करत तिला अनेकजण ट्रोल करत आहेत. काहीजण तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद या वर्षी मार्चमध्ये दिल्लीत विवाहबद्ध झाले होते. याआधी या जोडप्यानं कोर्ट मॅरेज केलं होतं, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या दोघांची प्रेमकहाणी २०२० मध्ये सुरू झाली होती.

हेही वाचा :

  1. kartik aaryan : काश्मीरच्या बर्फाळ नदीत स्नान करताना कुडकुडतोय कार्तिक आर्यन; पाहा व्हिडिओ...
  2. LEO Movie : थलपथी विजय स्टारर 'लिओ'नं मोडला 'पोनियिन सेल्वन पार्ट 1'चा विक्रम....
  3. Box Office King SRK : 'पठाण आणि जवान'मुळे शाहरुख खान बनला बॉक्स ऑफिसचा किंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.