मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वेब सीरीज 'ताली' आज १५ ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर रिलीज झाली आहे. सुष्मिता सेन या वेब सीरीजमध्ये एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. ही वेब सीरीज स्वातंत्र्य दिनानिमित्त ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरीजमध्ये गौरी सावंतच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाचा पैलू दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सुष्मिता सेनच्या 'ताली' वेब सीरीजमध्ये समाजातील ट्रान्सजेंडरचा संघर्ष कसा असतो हे दाखविले गेले आहे. या वेब सीरीजमध्ये सुष्मिताने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. सुष्मिताच्या या वेब सीरीजला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'ताली' वेब सीरीज प्रदर्शित : या वेब सीरिजद्वारे सुष्मिता तिच्या करिअरमधील सर्वोत्तम परफॉर्मन्स देताना दिसत आहे. 'ताली' ही वेब सीरिज खऱ्या कहाणीवर आधारित आहे. हा चित्रपट एका मुलाच्या कहाणीवर आधारित आहे, जो ट्रान्सजेंडरचे जीवन दत्तक घेऊन जगतो. या चित्रपटामध्ये तो मुलागा ट्रान्सजेंडरला थर्ड जेंडर ही पदवी मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढतो. दरम्यान आता सुष्मिता सेनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सुष्मिताने कॅप्शनमध्ये लिहिले, 'गणेश ते गौरीपर्यंतचा प्रवास आणि भारताच्या थर्ड जेंडरची लढाई' असे तिने लिहले आहे. या वेब सीरीजमध्ये सुष्मिता व्यतिरिक्त नितीश राठौर, अंकुर भाटिया, ऐश्वर्या नारकर, कृतिका देव, शान कक्कर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'ताली' वेब सीरीजची स्टारकास्ट : गौरीचा लढा ही एक प्रेरणादायी कहाणी आहे. गणेशच्या भूमिकेसाठी कृतिका देवला कास्ट करण्यात आले आहे, तर गौरी सावंतच्या भूमिकेसाठी सुष्मिता सेन कास्ट केले आहे. गौरीच्या रुपात सुष्मिता मजबूत दिसत आहे, यात शंका नाही. विजय विक्रम सिंग या वेब सीरीजमध्ये वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. भूमिका छोटी असली तरी पडद्यावर तो जबरदस्त दिसत आहे. गौरी सावंतच्या जीवनाची कहाणी लोकांसमोर योग्यरित्या दिग्दर्शकाने मांडली आहे. या वेब सीरीजमध्ये फाईटही दाखविण्यात आली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात तृतीय लिंगाची ओळख मिळवून देणारी गौरी, महाराष्ट्र निवडणूक समितीची ब्रँड अॅम्बेसेडर बनणारी पहिली ट्रान्सजेंडर आहे.
हेही वाचा :