मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या लूकमुळे फार चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या इन्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. काही वेळा ती आपल्या चाहत्यांना इन्टाग्राम लाईव्हवर येऊन चाहत्याशी संवाद साधत असते. सुष्मिता फॅशन स्टेटमेंटने अनेकांना प्रभावित करते. रविवारच्या रात्री ती आपल्या बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि मुलगी अलीसासह मुंबईतील एका अवॉर्ड शोमध्ये उपस्थित झाली होती. सुष्मिता बोल्ड नेकलाइनसह मखमली ब्लेझर आणि पॅन्ट परिधान केला होता. तिच्या हातात एक क्लच बॅग होता. तिने केस हे मोकळे सोडून टोकांवर ओले फिनिश असलेली स्लीप हेअरस्टाइल ठेवली होती. या लूकमध्ये सुष्मिता फार देखणी दिसत होती.
सुष्मिता सेन लूक : काल रात्री तिचे व्हिडिओ हे सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिचा हा लूक पाहिला. तिचा हा नवा लूक नेटकऱ्यांना खूप भावला आहे. खूप छान अशा आगळ्या वेगळ्या कमेंट या व्हिडिओवर तिचे चाहते करत आहे. सुष्मिता ही,आघाडीची एक व्यावसायिक आहे. तसेच तिने 'आर्या' सीझन 3 चे शूट पुन्हा सुरू केले आहे. लवकरच सुष्मिता सेनची ही डिजिटल पदार्पण करेल. सुष्मिताने जून 2020 मध्ये आर्या या सिरिजमध्ये काम केले होते. या मालिकेत, सुष्मिताने एका कठोर स्त्रीची भूमिका केली आहे, जी आपल्या कुटुंबाचे गुन्हेगारी जगापासून संरक्षण करण्यासाठी सीमेपलीकडे जाते.
लवकरच कम- बॅक करणार : या पहिल्या सीझनला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्रामा' मालिकेसाठी नामांकन मिळाले होते. राम माधवानी दिग्दर्शित, या मालिकेत नमित दास, मनीष चौधरी, सिकंदर खेर आणि विनोद रावत यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. शोचा दुसरा सीझन डिसेंबर २०२१ मध्ये रिलीज झाला होता आणि तिसर्या सीझनची रिलीज डेट अद्याप निर्मात्यांनी जाहीर केलेली नाही. तसेच सुष्मिता ही ट्रान्जेडर गौरी सावंतच्या बायोपीक तालीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रीगौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित 'ताली'चे हा चित्रपट आहे सुष्मिताने या चित्रपटाचे डबिंगही पूर्ण केले आहे. 2013 च्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) प्रकरणात ती याचिकाकर्त्यांपैकी एक होती, ज्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली होती.