ETV Bharat / entertainment

Sushmita Sen News : सुष्मिताने स्वतःला भेट दिली कोट्यवधींची आलिशान कार, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Jan 22, 2023, 12:19 PM IST

अभिनेत्री सुष्मिता सेन लक्झरी कारची शौकीन आहे. तिच्याकडे एकापेक्षा जास्त कार कलेक्शन आहेत. यावेळेस अभिनेत्रीने करोडोंची आलिशान कार खरेदी केली आहे आणि ती स्वतःला भेट दिली आहे, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

Sushmita Sen Luxury Car
अभिनेत्री सुष्मिता सेन

मुंबई : देशातील पहिली मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन अनेकदा कार खरेदी करत असते. त्यामुळेच तिच्याकडे एकापेक्षा जास्त कारचे कलेक्शन आहे. तिच्या कलेक्शनमध्ये आणखी एका नव्या काळ्या रंगाच्या आलिशान कारची भर पडली आहे. नवीन कारचे फोटो पाहून तुमची नजर कारवर थांबेल. वास्तविक सुष्मिता सेनला महागड्या वाहनांची शौकीन आहे, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुष्मिताकडे असणाऱ्या आलिशान गाड्यांबद्दल माहिती देणार आहोत. सुष्मिताकडे ऑडी, बीएमडब्ल्यू आणि लेक्सससारख्या लग्झरी कार्स आहेत. त्यात आणखी एका वाहनाची भर पडली आहे. खरे तर, तिने स्वतःला एक आलिशान कार गिफ्ट केली आहे, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

सुष्मिता सेनची नवीन कार : अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कारसोबतचा फोटो शेअर करून तिचा आनंद फॅन्ससोबत शेअर केला आहे. त्यामध्ये ती काळ्या रंगाची कार घेऊन उभी आहे. दोन फोटो शेअर करून तिने 'ब्युटी अँड द बीस्ट' असे कॅप्शन लिहिले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मिस युनिव्हर्सने काळ्या रंगाच्या कारसोबत पोज देण्यासाठी काळ्या रंगाचा पोशाख देखील निवडला होता. तिने काळा चष्मा आणि काळा ड्रेस परिधान करून डॅशींग लूक पूर्ण केला. त्यामध्ये ती जबरदस्त दिसते. सुष्मिता सेनची नवीन कार मर्सिडीज AMG GLE 53 Coupe मॉडेल आहे. बाजारात या कारची किंमत दोन कोटींहून अधिक आहे.

लक्झरी कारची झलक : अभिनेत्री सुष्मिताने इंस्टाग्रामवर कारचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, 'आणि ज्या महिलेला गाडी चालवायला आवडते, ती स्वत:ला हे शक्तिशाली आणि सुंदर गिफ्ट देते'. व्हिडीओमध्ये सुष्मिता चाहत्यांना लुकलुकणाऱ्या लक्झरी कारची झलक दाखवताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मिता सेनला महागड्या आणि सुंदर कार मॉडेल्सची शौकीन आहे, त्यामुळे तिच्याकडे कारचे खूप मोठे कलेक्शन आहे. यामध्ये Audi Q7, BMW 7 Series 730 LED, BMW X6 तसेच Lexus LX 470 मॉडेलचा समावेश आहे. सुष्मिता सेन ही तिच्या अभिनयसोबतच तिच्या रिलेशनशिप्समुळे नेहमीच चर्चेत असते. सुष्मिता सेनने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी मिस इंडियाचा किताब जिंकला होता. ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

हेही वाचा : रिया चक्रवर्तीने सुशांतच्या आठवणीत शेअर केला ठेवणीतला फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.