मुंबई - Suriya and Kanguva : साऊथचा सुपरस्टार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता सूर्या त्याच्या आगामी चित्रपट 'कांगुवा'मुळं चर्चेत आहे. हा चित्रपट 2024 रोजी रिलीज होणार आहे. 'कांगुवा' या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवा यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती स्टुडिओ ग्रीन आणि यूव्ही क्रिएशन्सच्या बॅनरखाली केई ज्ञानवेल राजा, व्ही. वामसी कृष्णा रेड्डी आणि प्रमोद उप्पलापाथी यांनी केली आहे. 'कांगुवा' चित्रपटात सुर्या शिवाय दिशा पटानी आणि बॉबी देओल हे कलाकार दिसणार आहेत. 'कांगुवा'शी संबंधित एक मोठे अपडेट समोर आली आहे. 'कांगुवा' जगभरात 38 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
BREAKING: #Suriya's #Kanguva to be released in 38 languages across the globe.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) November 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The film will have 3D and IMAX versions too.
BIGGEST… pic.twitter.com/A1WTCVTvp8
">BREAKING: #Suriya's #Kanguva to be released in 38 languages across the globe.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) November 20, 2023
The film will have 3D and IMAX versions too.
BIGGEST… pic.twitter.com/A1WTCVTvp8BREAKING: #Suriya's #Kanguva to be released in 38 languages across the globe.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) November 20, 2023
The film will have 3D and IMAX versions too.
BIGGEST… pic.twitter.com/A1WTCVTvp8
'कांगुवा'मध्ये सुर्याचा दिसेल अनोखा अंदाज : 'कांगुवा' चित्रपट थ्रीडी (3D) आणि आयमॅक्स (IMAX) व्हर्जनमध्येही प्रदर्शित केला जाईल. तमिळ चित्रपट इतक्या भाषांमध्ये प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटामध्ये सूर्या त्याच्या मागील चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 'कांगुवा' चित्रपटामधील त्याचं गेटअप खूप वेगळे आहे. सूर्या या चित्रपटामुळं बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे आणि तो सतत त्याच्या चित्रपटावर काम करत आहे. 'कांगुवा' चित्रपटाला 'पुष्पा' फेम संगीत दिग्दर्शक श्री देवी प्रसाद यांनी संगीत दिलं आहे. 'कांगुवा' ही एका पराक्रमी शूर वीराची कहाणी असणार आहे. या चित्रपटामध्ये सुर्या अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : 'कांगुवा' चित्रपटाबद्दल बोललं जात आहे की हा चित्रपट 11 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सूर्याचे 13 वेगवेगळे लूक पाहायला मिळणार आहेत. 'कांगुवा'चं बजेट 300 ते 350 कोटी रुपये आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपटाचा दिग्दर्शक शिवा यांनी 2019 मध्ये तमिळ सुपरस्टार अजित कुमारसोबत 'विश्वसम' हा चित्रपट बनवला होता. याआधी त्यांनी 2017 मध्ये 'विवेकम' हा चित्रपट देखील निर्मित केला होता. 'कांगुवा' या चित्रपटापासून सुर्याला खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा :