ETV Bharat / entertainment

Sunny Deol : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेत झळकणार सनी देओल ? - नितीश तिवारी

Sunny Deol : सनी देओलला 'गदर 2' चित्रपटानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांची ऑफर मिळत आहे. दरम्यान, आता सनी नितीश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटामध्येही तो झळकेल असं बोललं जात आहे.

Sunny Deol
सनी देओल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 5:37 PM IST

मुंबई - Sunny Deol : 'गदर 2' चित्रपटातून 22 वर्षानंतर सनी देओल 'तारा सिंग'च्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकला होता. पुनरागमन करणाऱ्या सनी देओलनं पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कमबॅक केलं आहे. 'गदर 2'च्या शानदार यशानंतर सनी देओलला एकापाठोपाठ एक चित्रपट ऑफर होत आहेत. याआधी अभिनेता आमिर खाननं सनी देओलसोबत 'लाहोर 1947' या चित्रपटाची घोषणा केली होती. ही घोषणा झाल्यानंतर सनी देओलच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. दरम्यान आता सनी देओल हा 'रामायण' चित्रपटामध्ये हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे.

सनी देओल ‘रामायण’ चित्रपटात झळकेल ? : दिग्दर्शक नितीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘रामायण’ चित्रपटात हनुमानजीच्या भूमिकेसाठी सनी देओलला कास्ट करत असल्याच्या सध्या चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सनी आणि नितेशमध्ये याबाबत चर्चा झाली असून या भूमिकेबद्दल तो सकारात्मक दिसत आहे. याबद्दल अधिकृत झालेली नाही. नितीश यांना रामायण चित्रपटात सनी देओलला हनुमानजीच्या भूमिकेत पाहायचं असल्याचं बोललं जात आहे. 'रामायण' चित्रपटामध्ये जर सनी हा हनुमानजीच्या भूमिकेत झळकला तर तो थिएटरमध्ये वादळ निर्माण करेल असा अंदाज लावला जाऊ शकतो.

'रामायण' चित्रपटाची स्टारकास्ट : नितीश तिवारी, मधु मंटेना, नमित मल्होत्रा ​​आणि अल्लू अरविंद यांच्या 'रामायण' चित्रपटाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. या चित्रपटाबद्दल लवकरच घोषणा होणार आहे. 'रामायण' चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि साऊथ अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय केजीएफ स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या 'रामायण'मधील स्टार कास्टची अद्याप पुष्टी झालेली नाही. प्रभू रामाची स्वच्छ प्रतिमा पडद्यावर मांडण्यासाठी रणबीर कपूर हा मांसाहार, धूम्रपान आणि मद्यपान बंद करणार आहे. शूटिंग होईपर्यंत तो या सर्व गोष्टींना हात लावणार नाही. रामाची भूमिका शुद्धपणे साकारण्यासाठी रणबीर हे करणार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :

  1. Hua Mai Song Out : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल'मधील 'हुआ मैं' हे गाणं झालं प्रदर्शित; पहा व्हिडिओ...
  2. Amitabh Bachchan Upcoming Movies : 'या' आगामी चित्रपटात दिसणार 'बिग बी'चा जलवा...
  3. Aamir daughter Ira Khan wedding: मुलीच्या लग्नात भावनिक होणार आमिर खान, कुटुंबीयांना सातवतेय चिंता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.