ETV Bharat / entertainment

'टायगर 3' च्या यशाबद्दल सनी देओलनं केलं सलमान खानचं अभिनंदन - सनी देओलनं भाईजानचं केलं अभिनंदन

Sunny Deol and Salman Khan: 'टायगर 3' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानं फार कमी वेळात जास्त कमाई केलीय.याबद्दल अनेकजण सलमान खानचं अभिनंदन करताहोत. दरम्यान, सनी देओलनं भाईजानसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Sunny Deol and Salman Khan
सनी देओल आणि सलमान खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 10:14 AM IST

मुंबई - Sunny Deol and Salman Khan: 'टायगर 3' हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. सलमान खानचा 'टायगर 3' सध्या रुपेरी पडद्यावर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केलंय. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होताना दिसतेय. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. 'टायगर 3' देशातच नाही तर जगभरात चांगली कमाई करत आहे. दरम्यान, अभिनेता सनी देओलनं चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केलाय. त्यानं सलमान खानसोबतचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलीय.

सनीनं सलमानसोबतचा फोटो शेअर केला : 'टायगर 3' च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर पहिल्याच दिवशी या चित्रपटानं भारतात 44.5 कोटींचा व्यवसाय केला. पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्येच 'टायगर 3'नं 'गदर 2'ला मागे टाकलं होतं. देशांतर्गत या चित्रपटानं 236.43 कोटीची कमाई केली आहे. वर्ल्डवाइड 'टायगर 3'नं आतापर्यंत 371 कोटी रुपये कमवलेत. चित्रपटाच्या शानदार कलेक्शननंतर सनीनं सलमानचं अभिनंदन केलंय. सनीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'जिंकलो'. या फोटोमध्ये सनी देओल सलमान खानच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे. फोटोत भाईजाननं रॉयल ब्ल्यू रंगाचा शर्ट घातलाय. याशिवाय सनीनं फोटोत लाईट ब्राऊन टी-शर्टसह ऑफ व्हाईट कलरचा ब्लेजर घातला आहे. दोघेही फोटोमध्ये खूप सुंदर दिसताहेत.

चाहत्यांनी कमेंट केली : सनी देओलच्या या पोस्टवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं पोस्टवर लिहलं, 'बॉलिवूडचे 2 सिंह एकत्र'. तर दुसर्‍या चाहत्यानं लिहलं, 'दोघांनीही एक अ‍ॅक्शन चित्रपट एकत्र केला पाहिजे'. आणखी एका चाहत्यानं लिहलं, 'बॉलिवूडसाठी हे वर्ष खूप खास आहे'. सलमान खान आणि सनी देओलनं 'जीत' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट 1996 मध्ये आला होता. 'जीत'मध्ये सलमान आणि सनीसोबत करिश्मा कपूर, अमरीश पुरी आणि तब्बू यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. काही दिवसांपूर्वी सनी देओलनं त्याच्या इन्स्टा स्टोरीवर सलमानला 'टायगर 3'साठी शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टवर त्यानं कॅप्शन दिलं होत, 'टायगर जिंदाबाद'. 'टायगर 3' हा चित्रपट लवकरच 300 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करेल.

हेही वाचा :

  1. अनुराग ठाकूर यांनी 54व्या इफ्फी महोत्सवात माधुरी दीक्षितला विशेष पुरस्कार केला जाहीर
  2. 'डंकी' चित्रपटामधील पहिलं गाणं 'लूट टूट' लवकरच होणार रिलीज
  3. सलमान खाननं 'टायगर' फ्रँचायझीच्या चौथ्या भागाचेही दिले संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.