ETV Bharat / entertainment

अक्षयच्या जागी 'हेरा फेरी ३' मध्ये कार्तिक आर्यन, निर्माता गुंता सोडवेल याची सुनिल शेट्टीला खात्री - हेरा फेरी ३

हेरा फेरीच्या तिसर्‍या भागात कार्तिक आर्यनच्या प्रवेशाबाबत सुनील शेट्टी म्हणाले की, स्ट्रीटस्मार्ट राजू म्हणून अक्षय कुमारची जागा कोणीही घेऊ शकत नाही. सुनिल शेट्टीने असेही उघड केले की कार्तिक पूर्णपणे नवीन भूमिका साकारणार आहे आणि तो साकारत असलेल्या भूमिकेत तो अद्भुत ऊर्जा आणेल.

हेरा फेरी ३ मध्ये कार्तिक आर्यन
हेरा फेरी ३ मध्ये कार्तिक आर्यन
author img

By

Published : Nov 18, 2022, 10:31 AM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीने गुरुवारी सांगितले की, कार्तिक आर्यन हेरा फेरी फ्रँचायझीमध्ये सामील झाल्याबद्दल तो खूपच रोमांचित झाला आहे. त्याने हेही स्पष्ट केले की आगामी तिसऱ्या भागात कार्तिकने अक्षय कुमारची जागा घेतलेली नाही. लोकप्रिय कॉमेडी चित्रपट मालिका राजू (कुमार), श्याम (शेट्टी) आणि बाबू भैय्या (परेश रावल) या तीन पुरुषांभोवती फिरते जे झटपट पैसे कमवण्याच्या येडपट योजना आखत राहतात.

गेल्या आठवड्यात दिल्लीतील एका कार्यक्रमात, अक्षय कुमारने क्रिएटिव्ह फरकांचा हवाला देऊन हेरा फेरी 3 मधून बाहेर पडल्याची पुष्टी केली होती. त्याआधी, परेश रावल म्हणाले होते की आगामी चित्रपट लवकरच शुटिंग फ्लोअरवर जाईल आणि कार्तिक आर्यन राजूची भूमिका साकारेल.

चित्रपटाच्या तिसर्‍या भागात कार्तिक आर्यनच्या प्रवेशादरम्यान, सुनिल शेट्टी म्हणाला की स्ट्रीटस्मार्ट राजू म्हणून अक्षय कुमारची जागा कोणीही घेऊ शकत नाही. "कार्तिक आर्यन ही एक उत्तम निवड आहे, (परंतु) तो राजूची भूमिका करत नाही. कार्तिक एक पूर्णपणे नवीन व्यक्तिरेखा आहे आणि तो साकारणार असलेल्या भूमिकेत आश्चर्यकारक ऊर्जा आणेल. राजूची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आता राजू आणि फिरोज (निर्माता नाडियादवाला) भाईंनी हेरा फेरीचा गुंता सोडवायची आहे," शेट्टी म्हणाले.

2000 मध्ये प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट प्रियदर्शनने दिग्दर्शित केला होता. त्याचा सिक्वेल फिर हेरा फेरी (2006) मध्ये त्याच कलाकारांनी त्यांच्या प्रतिष्ठित पात्रांची पुनरावृत्ती केली. दिवंगत अभिनेते-चित्रपट निर्माते नीरज व्होरा यांनी दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन केले होते. गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या भागावर काम सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, फिरोज नाडियादवाला यांच्या पाठिंब्याने, हेरा फेरी 3 चे दिग्दर्शन अनीस बज्मी करणार आहेत.

सुनिल शेट्टीच्या मते, हिट चित्रपटाची व्याख्या त्याच्या मध्यवर्ती पात्रांच्या लोकप्रियतेवरून केली जाते, जे हेरा फेरीच्या बाबतीत घडले. "मला असे वाटते की एक हिट चित्रपट म्हणजे राजू, श्याम, बाबू भैया यांसारखी पात्रे लक्षात राहतात. हेरा फेरीतील साधेपणा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

"मला माहित नव्हते की हा चित्रपट असा क्लासिक बनेल. पण मला माहित होते की त्याचे कौतुक केले जाईल," असे हेरा फेरीमध्ये श्यामची भूमिका करणारा 61 वर्षीय अभिनेता सुनिल शेट्टी पुढे म्हणाला.

"बाबू भैया हा चित्रपटाचा आत्मा आहे आणि तो राजू आणि श्याम या दोन अ‍ॅक्शन हिरोवर नियंत्रण ठेवतो. मला वाटते की प्रेक्षकांना हे आवडले. आम्ही चित्रपटात अभिनय केला नाही, आम्ही फक्त स्वतः होतो आणि म्हणूनच हेरा फेरीने नेहमीच काम केले आहे, " तो म्हणाला.

"क्लीन कॉमेडीज नेहमीच जादूसारखे काम करतील आणि लहान मुलांपासून ते वृद्धांना आवडतील. तुम्हाला ते फास्ट फॉरवर्ड करून बघायचे आहे असे तुम्हाला वाटणार नाही," असे सुनिल शेट्टी तो पुढे म्हणाला. सुनिल शेट्टी त्याची पहिली वेब सीरिज धारावी बँकच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. समित कक्कड दिग्दर्शितही मालिका 19 नोव्हेंबर रोजी एमएक्स प्लेयरवर येणार आहे.

हेही वाचा - नवाजुद्दीन सिद्दीकी हड्डीमध्ये साकारतोय ट्रान्सजेंडरची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.