ETV Bharat / entertainment

Suniel Shetty : सुनिल शेट्टीला टोमॅटो महाग, नेटीझन्सनी केली खरडपट्टी

author img

By

Published : Jul 13, 2023, 3:22 PM IST

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी जो वर्षाला १०० कोटी रुपये कमावतो, त्याला देखील टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे फटका बसत आहे. तो देखील आता टोमॅटो कमी खात असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचे हे मत नाटकीपणाचे असल्याचे काहींना वाटत आहेत.

Suniel Shetty
सुनील शेट्टी

मुंबई : गरीब जनतेच्या भाजीतून टोमॅटो गायब झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सध्या भाज्यांच्या किंमत फार जास्त वाढत आहेत, हे आपल्याला माहित आहे. मात्र आता सर्वात जास्त भाज्यामध्ये टोमॅटोचा भाव वाढलेला आहे. भाज्यामध्ये सर्वत्र सध्या टोमॅटोला चांगलाच भाव मिळत आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे टोमॅटोचे भाव शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. आता लोक फारच कमी टोमॅटोचा वापर भाजीत करत आहे. मग कोणी गरीब असो वा श्रीमंत, सर्वांनाच टोमॅटोच्या वाढत्या भाव परिणाम सहन करवा लागत आहे.

टोमॅटोची वाढती किंमत : सध्या बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने टोमॅटोच्या भाव वाढीवरून एक वक्तव्य केले आहे. सुनीलने सांगितले की, टोमॅटोच्या वाढत्या किंमती समोर कंगाल झाल्या सारखे वाटत आहे. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे त्याने आहारातील टोमॅटोचे प्रमाण कमी केले आहे. आता हा परिणाम श्रीमंतावर देखील पडत आहे, तर सर्व सामान्य जनतेला टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर आपला खिसा किती खाली करवा लागत आहे आणि त्यामुळे घरच्या बजेटमध्ये किती परिणाम होत असल्याचे दृष्य आता बघायला मिळत आहे.

टोमॅटोने खराब केले सुनील शेट्टीचे बजेट : टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर सुनील शेट्टीने म्हटले की, माझी पत्नी माना शेट्टी ही एक ते दोन दिवसानी भाजी खरेदी करते, कारण आपण ताज्या गोष्टी खाण्याला महत्त्व देतो. आजकाल टोमॅटो खूप महाग होत आहेत, त्याचा परिणाम आपल्या स्वयंपाकघरावरही होत आहे. त्यामुळेच आजकाल मी टोमॅटोही कमी खातोय. लोकांना वाटेल की मी एक अभिनेता आहे आणि त्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण तसे नाही, आम्हालाही अशा गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो'. असे सुनील शेट्टी सांगितले की, मी ऑनलाइन टोमॅटो ऑर्डर करतो, तिथे ते स्वस्त असतील म्हणून नाही, तर ऑनलाइन भाज्या या ताज्या पुरवतात. याव्यतिरिक्त याचा सरळ फायदा हा शेतकऱ्यांना होतो.

सुनिल शेट्टी ट्रोल - सुनिल शेट्टीला टोमॅटो खाणे परवडत नाही ही गोष्ट बऱ्याचजणांना खटकली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जेव्हा बरा भाव मिळतो तेव्हा करोडो कमवणाऱ्या सुनिल सारख्या सेलेब्रिटींना जड का वाटते यावर लोक बोलत आहेत. त्याचे हे मत नाटकीपणाचे असल्याचे काहींना वाटत आहेत.

हेही वाचा :

  1. Nikhil Advanis film : तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम एकत्र, निखील अडवाणींचा चित्रपट केला साइन
  2. Parineeti Chopra And Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाने लपविला चेहरा...
  3. Anupam Kher : अनुपम खेरने ५३९ व्या बहुभाषिक चित्रपटाची केली घोषणा, फर्स्ट लूक केले शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.