ETV Bharat / entertainment

अगस्त्य नंदासोबत केलेल्या डान्समुळं सुहाना खान झाली ट्रोल, पाहा व्हिडिओ - Suhana Khan

Suhana Khan danced with Agastya Nanda : सुहाना खान आणि अगस्त्य नंदा त्यांच्या 'द आर्चीज' टीमसोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघेही स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत.

Suhana Khan danced with Agastya Nanda
सुहाना खानने अगस्त्य नंदासोबत डान्स केला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 11:57 AM IST

Updated : Nov 26, 2023, 12:18 PM IST

मुंबई - Suhana Khan danced with Agastya Nanda : शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत पर्दापण करणार आहे. सुहानाचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'द आर्चीज'चे कलाकार चित्रपटाचं प्रमोशन सध्या करताना दिसत आहे. या चित्रपटाबाबत शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाची स्टार कास्ट जमली होती. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार्स आले होते. सगळ्यांच्या नजरा सुहानावर खिळल्या होत्या. ज्यामध्ये सुहाना खान अगस्त्य नंदासोबत स्टेजवर डान्स करत आहे. या दोघांच्या डान्सवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सुहाना आणि अगस्त्यचा व्हिडिओ : या कार्यक्रमात सुहानानं शॉर्ट फ्रॉक घातला होता. यावर खूप खास दिसत आहे. दुसरीकडे अगस्त्य नंदानं टी-शर्टसह जॅकेट आणि पँट परिधान केला आहे. या लूकमध्ये तो खूप देखणा दिसत होता. या दोघांनीही 'द आर्चिज'मधील गाण्यावर एकत्र डान्स या कार्यक्रमात केला. यांचा डान्स हा अनेक यूजरर्सला आवडला नाही. अनेकजणांनी या डान्सला स्कूलमधील असल्याचं म्हटलं आहे. पापाराझीनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. एक यूजर या पोस्टवर कमेंट सेक्शनमध्ये लिहलं, 'मुलांचा वार्षिक कार्यक्रम होत आहे'. दुसऱ्या यूजरनं लिहलं, 'माझ्या शाळेतील डान्स सध्या ट्रेंड होत आहे'. आणखी एकानं लिहलं, 'हे दोघेही काय करत आहेत?' याशिवाय एका युजरनं त्यांना पाठिंबा देत लिहलं, 'त्यांना प्रोत्साहन द्या असं ट्रोल करू नका. त्यांची तुलना त्यांच्या पालकांशी किंवा आजी-आजोबांशी करू नका.' याशिवाय काहीजणांनी या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहेत.

'द आर्चीज' चित्रपटाबद्दल : 'द आर्चीज' 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुहाना, अगस्त्य, खुशी कपूर, वेदांग रैना, मिहिर आहुजा, युवराज मेंडा आणि अदिती डॉट यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कहाणी 1964 च्या पार्श्वभूमीवर आहे. जेव्हा वेरोनिका, बेट्टी आणि त्यांचे मित्र जीवनाचा आनंद घेतात. तेव्हा वेरोनिकाच्या वडिलांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी ग्रीन पार्कचे मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर करायचे असते, तेव्हा त्यांच्या जीवनात मोठा बदल होतो. त्यामुळे त्यांच्या मैत्रीवर परिणाम होतो. नंतर ते एकत्र येतात आणि एका मिशनची तयारी करतात.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू, शो झाले हाऊसफुल्ल
  2. कतरिना कैफनं सांगितला तिचं हेलिकॉप्टर कोसळतानाचा भीषण अनुभव
  3. रणदीप हुड्डा गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत चढणार बोहल्यावर

Last Updated : Nov 26, 2023, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.