ETV Bharat / entertainment

Sunny Deol And Akshay Kumar : अक्षय कुमारने सनी देओलचं घर लिलावापासून वाचवलं? काय आहे सत्य जाणून घ्या...

सनी देओलच्या कर्जाचा मुद्दा आणि त्याच्या जुहू मालमत्तेच्या लिलावाच्या बातम्या यामध्ये काही संबंध नाही. सनीच्या टीमने याप्रकरणी काही खुलासे केले आहेत. तसेच अक्षय कुमारने सनी देओलला याप्रकरणी मदत करण्याचा दावा देखील खोटा ठरवला आहे.

Sunny Deol And Akshay Kumar
सनी देओल आणि अक्षय कुमार
author img

By

Published : Aug 21, 2023, 3:27 PM IST

मुंबई : सनी देओलच्या बंगल्याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. सनी देओलवर ५६ कोटी रुपयांचं कर्ज असून ते वसूल करण्यासाठी 'बँक ऑफ बडोदा'ने त्याच्या मालमत्तेचा लिलाव करत असल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रात देण्यात आल्या होत्या. २४ तासांच्या आत 'बँक ऑफ बडोदानं' यावर स्पष्टीकरण देत आदल्या दिवशी प्रकाशित केलेली जाहिरात तांत्रिक चूक असल्याचं सांगितलं. सनी देओलच्या टीमनेही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, यासंबंधात आणखी एक दावा केला जाऊ लागला होता की, अक्षय कुमारनं सनी देओलचं कर्ज फेडलं. यावर सनीच्या टीमनं प्रतिक्रिया देत हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

सनी देओलच्या टीमनं दिलं स्पष्टीकरण : सनी देओलच्या मदतीसाठी अक्षय कुमार पुढं आला आणि त्याचं घर वाचवण्यासाठी त्यानं ५६ कोटी रुपयांचं कर्ज फेडलं, असा दावा बातम्यांमध्ये करण्यात आला होता. दरम्यान, आता सनी देओलच्या टीमनं याप्रकरणी स्पष्ट केलं की या सर्व चुकीच्या बातम्या आहेत. अक्षय कुमारनं अशी काहीही मदत केली नाही. यासोबतच सनीच्या टीमनं असंही म्हटलं आहे की, या प्रकरणावर कोणतीही खोटी बातमी पसरवू नये.

काय आहे प्रकरण : खरं तर, 'बँक ऑफ बडोदानं' आदल्या दिवशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत सनी देओलवर ५६ कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं सांगण्यात आलं होतं. या कर्जाच्या व्याजाच्या वसुलीसाठी 'बँक ऑफ बडोदा'कडून सनीच्या व्हिलाचा लिलाव केला जात आहे. या जाहिरातीत लिलावाची तारीखही समोर आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, ५१.४३ कोटी रुपयांच्या राखीव किंमतीवर २५ सप्टेंबरपासून लिलाव सुरू होणार होता. ही बाब समोर आल्यानंतर लगेच 'बँक ऑफ बडोदा'नं एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात आदल्या दिवशी प्रसिद्ध झालेली जाहिरात तांत्रिक चुकीमुळं छापण्यात आल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं. सनी देओलवर कर्ज आहे की, नाही हे सध्या 'बँक ऑफ बडोदा'ने स्पष्ट केलेलं नाही. तसेच 'बँक ऑफ बडोदानं' सनी देओलसोबत झालेल्या संभाषणाची कोणतीही माहिती मीडियासोबत शेअर केलेली नाही.

हेही वाचा :

  1. Bhumika chawla birthday special : 'या' चित्रपटाने भूमिका चावलाला दिली प्रसिद्धी ; वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिचा प्रवास...
  2. Gadar 2 Box Office Collection Day 10: सनी देओल स्टारर 'गदर २' हा लवकरच बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा करेल पार...
  3. Sunny Deols Juhu Bungalow : खासदार सनी देओल यांच्या बंगल्याचा बँक ऑफ इंडियाकडून लिलाव रद्द, काँग्रेसने 'हा' विचारला प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.