मुंबई - आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या पौराणिक साय-फाय ड्रामा ब्रह्मास्त्र ( Brahmastra ) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चित्रपट निर्माता अयान मुखर्जीने ( Ayan Mukerji ) सिनेफिलर्सची उत्सुकता वाढवली आहे.
ट्रेलर लॉन्चनंतर, सुपरस्टार शाहरुख खान या चित्रपटात कॅमिओ करणार असल्याची जोरदार चर्चा होती. जूनमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी ट्रेलरमधील स्क्रीनशॉट शेअर केले आणि आश्चर्य झाले की हा तर वायुच्या रुपातील किंग खान आहे आणि आता असे दिसते घारीची नजर बाळगणाऱ्या चाहत्यांनी केलेले निरीक्षण योग्य आहे.
-
#SRK looks in #Brahmastra 😍
— Arif Abdullah (@arif_the_wander) August 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Day by Day Expectations increase hote ja rha hai🤤#Srkians #RanbirKapoor #AliaBhatt pic.twitter.com/8ocnUoSP6N
">#SRK looks in #Brahmastra 😍
— Arif Abdullah (@arif_the_wander) August 11, 2022
Day by Day Expectations increase hote ja rha hai🤤#Srkians #RanbirKapoor #AliaBhatt pic.twitter.com/8ocnUoSP6N#SRK looks in #Brahmastra 😍
— Arif Abdullah (@arif_the_wander) August 11, 2022
Day by Day Expectations increase hote ja rha hai🤤#Srkians #RanbirKapoor #AliaBhatt pic.twitter.com/8ocnUoSP6N
गुरुवारी नेटिझन्सनी ब्रह्मास्त्रमधील एसआरकेचा लूक असल्याचा दावा करत एक नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केला. व्हायरल क्लिपमध्ये शाहरुख रक्ताने माखलेल्या अवतारात दिसत आहे. जसजसे शाहरुखचे पात्र हवेत उंचावते तसतसे भगवान हनुमानाची आकृती दिसू लागते.
या खास झलकमुळे शाहरुखचे चाहते खूप खूश झाले. "लेडीज अँड जेंटलमॅन, शाहरुख खान ब्रह्मास्त्रमध्ये वानर अस्त्र आहे," असे एका ट्विटर युजरने लिहिले. "एसआरकेचा कॅमिओ हा अयान मुखर्जीचा शाहरुख खानवरील प्रेमाचा पुरावा आहे," असे आणखी एकाने लिहिले.
तथापि, व्हायरल क्लिप ब्रह्मास्त्रची आहे की केवळ चाहत्यांनी एडिट करुन बनवली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्या ताज्या रिलीज झालेल्या लाल सिंग चड्ढामध्ये शाहरुखचाही एक कॅमिओ आहे. त्यापूर्वी, शाहरुखने आर. माधवनच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्टमध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती.
शाहरुखचे चाहते आता तो मोठ्या पडद्यावर परतण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्याचे पठाण, जवान आणि डंकी हे तिनी चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्यावर आहेत.
हेही वाचा - Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत गंभीर