मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा आगामी चित्रपट जवान हा 2023 मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. त्याच्या मागील पठाण चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक यश मिळाले होते. बॉलिवूडचा किंग खान आता त्याच्या आगामी जवान चित्रपटाच्या रिलीजच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवानसाठी पठाण स्टाईलने प्रमोशन केले जाणार आहे.
पठाणच्या पद्धतीने होणार जवानचे प्रमोशन - प्रमोशनल टाइमलाइनच्या बझनुसार, जवानचे पोस्टर आणि टीझर एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात रिलीज होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे पठाणच्या रणनीतीनुसार, आपण निर्मात्यांकडून ट्रेलरपूर्वी चित्रपटाचे संगीत रिलीज करण्याची अपेक्षा करू शकतो. चित्रपटाची पहिली आणि दुसरी गाणी अनुक्रमे मे महिन्याच्या पहिल्या आणि दुस-या आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, चित्रपटाचा ट्रेलर मेच्या शेवटच्या आठवड्यात अपेक्षित आहे, तर चित्रपट जूनच्या पहिल्या आठवड्यात थिएटरमध्ये येण्याची शक्यता आहे.
जवान प्रमोशनसाठी निर्मात्यांची तयारी - चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर तो OTT प्लॅटफॉर्मवर प्रवाहित करण्याच्या अधिकारांसाठी वाटाघाटी सुरू आहेत. अहवालानुसार, अनेक महत्त्वपूर्ण OTT प्लॅटफॉर्म चित्रपटाचे हक्क सुरक्षित करण्यासाठी जोरदार बोली युद्ध सुरु आहेत. अलीकडील अहवालानुसार, जवान मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे कारण त्याचे व्यापक आकर्षण आहे आणि मोठ्या प्रमाणात बजेटसह त्याची निर्मिती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, एक बहुभाषिक चित्रपट असल्याने, तो देशभरातील प्रेक्षकांशी जोडला जाईल आणि विविध प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. साऊथचे ख्यतनाम दिग्दर्शक अॅटली यांचा हा चित्रपट दक्षिण भारतातही चांगली कमाई करु शकेल याची खात्री निर्मात्यांना आहे. त्यामुळे काही साऊथ स्टार्सचाही समावेश चित्रपटात आहे. मुख्य म्हणजे लेडी सुपरस्टार नयनतारा यामध्ये शाहरुखसोबत काम करत आहे. साऊथचा आणखी एक सुपरस्टार विजय सेतुपथी, अभिनेत्री प्रियामणी आणि कॉमेडियन योगी बाबू या चित्रपटात झळकणार आहेत.
ओटीटी स्ट्रिमिंगसाठी हक्क घेण्यात नेटफ्लिक्स आघाडीवर - असे दिसते की नेटफ्लिक्स सध्या आपल्या प्लॅटफॉर्मवर जवानला प्रवाहित करण्याच्या अधिकाराच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अॅटली दिग्दर्शित, या चित्रपटात विजय सेतुपती, नयनतारा, संजय दत्त आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत, तर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चित्रपटात विस्तारित कॅमिओ भूमिका साकारणार आहे.