ETV Bharat / entertainment

शाहरुखने ३० दिवसांच्या चेन्नई मुक्कमात रजनीकांतसह दिग्गजांसोबत घालवला वेळ - शाहरुख आणि विजय सेतुपती

शाहरुख खान आणि टीमने जवान या चित्रपटाचे चेन्नईतील शुटिंग पूर्ण केले आहे. चेन्नई शहरात त्याच्या 30 दिवसांच्या कालावधीत शाहरुखला प्रेमाची जाणीव करून दिली ते दुसरे तिसरे कोणी नसून, रजनीकांत, विजय सेतुपती आणि विजय या तमिळ चित्रपट उद्योगातील सर्वात मोठ्या स्टार यांनी.

शाहरुख खान आणि टीम
शाहरुख खान आणि टीम
author img

By

Published : Oct 8, 2022, 1:19 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान तामिळ चित्रपट निर्माता अॅटलीच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. 'जवान' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात नयनताराही मुख्य भूमिकेत आहे. शाहरुख आणि टीम जवान यांनी अलीकडेच चेन्नईमधील चित्रपटाचे शुटिंग शेड्यूल गुंडाळले आहे. त्यानंतर साऊथचे दिग्गज सुपरस्टार रजनीकांत, विजय सेतुपती आणि विजय यांनी त्यांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत.

एसआरके आणि अॅटलीने जवान शेड्यूल पूर्ण केल्यावर, शाहरुखने चेन्नईमधील त्याचे 30 दिवस कसे होते हे ट्विटरवर शेअर केले आहे. त्याने लिहिलंय, "30 दिवसांचा धमाका RCE टीम! थलायवाने आमच्या सेटवर आम्हाला आशीर्वाद दिला... नयनतारासोबत चित्रपट पाहिला आणि अनिरुध्द, विजय सेतुपती यांच्यासोबत सखोल चर्चा केली आणि विजयसोबत स्वादिष्ठ भोजनाचा आनंद लुटला."

  • Wot a 30 days blast RCE team! Thalaivar blessed our sets…saw movie with Nayanthara partied with @anirudhofficial deep discussions with @VijaySethuOffl & Thalapathy @actorvijay fed me delicious food.Thx @Atlee_dir & Priya for ur hospitality now need to learn Chicken 65 recipe!

    — Shah Rukh Khan (@iamsrk) October 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेत्याने त्याच्या जवान चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली आणि त्याची पत्नी कृष्णा प्रिया यांचे आदरातिथ्याबद्दल आभार मानले. "अॅटली सर आणि प्रिया तुमच्या आदरातिथ्यासाठी आता चिकन 65 रेसिपी शिकण्याची गरज आहे!" त्याच्या लेटेस्ट ट्विटनुसार, SRK ने तामिळनाडूमध्ये जवानसाठी शूटिंग करताना चांगला वेळ घालवला होता, जिथे त्याचे तामिळ चित्रपट उद्योगातील दिग्गजांनी जोरदार स्वागत केले.

अॅटली कुमार दिग्दर्शित, जवान हा चित्रपट गौरी खान निर्मित आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रस्तुत आहे. शाहरुखने शेअर केलेल्या चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरने विशेषत: किंग खानच्या अनोख्या लुकने आधीच जोरदार चर्चा निर्माण केली आहे. जवान 2 जून 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

जवान चित्रपटाशिवाय, शाहरुख खान यांच्याकडेही दोन अपेक्षीत प्रकल्प आहेत. सिद्धार्थ आनंदच्या पठाणमध्ये दीपिका पदुकोण, जॉन अब्राहमसोबत आणि तापसी पन्नूच्यासह राजकुमार हिरानी यांच्या डंकीमध्ये शाहरुख खान झळकणार आहे.

हेही वाचा - शहनाज गिलचे वडील संतोख सिंग सुख यांना जीवे मारण्याची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.