मुंबई - सुपरस्टार शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांना ईद-उल-फित्रच्या मुहूर्तावर त्याच्या मन्नतबंगल्याच्या बाल्कनीतून, देत त्यांना सर्वोत्तम ईदी भेट दिली. अनेक व्हायरल फोटो आणि व्हिडिओंमध्ये सुपरस्टार 2023 च्या ईदच्या निमित्ताने शनिवारी मुंबईतील त्याच्या विस्तीर्ण निवासस्थानी गेलेल्या त्याच्या चाहत्यांना अभिवादन करताना दिसत आहे. शाहरुखची झलक पाहण्यासाठी आणि त्याला ईदच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी भर उन्हात लोक तासंतास उभे होते. यातील अनेक चाहते मुंबई बाहेरुन शाहरुखच्या दर्शनासाठी पोहोचले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शाहरुखने कृतज्ञपणे स्वीकारले चाहत्यांचे प्रेम - किंग खानने त्याच्या चाहत्यांना 2023 च्या ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या मन्नत बंगल्याच्या बाहेर कडक उन्हात ताटकळणाऱ्या जनसागराला त्याने अभिवादन केले. व्हिडिओमध्ये लोक उत्स्फुर्तपणे सुपरस्टारला पाहून आनंद व्यक्त करताना दिसतात. यावेळी शाहरुखने काळ्या डेनिमच्या जोडीसह एक साधा पांढरा टी-शर्ट घातला होता. त्याने त्याच्या ईद लूकमध्ये मस्त शेड्स आणि मणी असलेला हार जोडला होता. चाहते आणि पापाराझी सुपरस्टारची छायाचित्रे क्लिक करताना दिसले. चाहत्यांना फ्लाईंग किस देत शाहरुखने आपली सिग्नेचर पोजही दिली. घरात परत जाण्यापूर्वी शाहरुखने पुन्हा एकदा चाहत्यांना नमन केले.
शाहरुखचे आगामी चित्रपट - दरम्यान, वर्कफ्रंटवर, किंग खानचा जवान हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. तमिळ दिग्दर्शक एटली कुमार दिग्दर्शित हा चित्रपट निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. जवानमध्ये नयनतारा आणि विजय सेतुपती हे तमिळ इंडस्ट्रीतील दोन मोठे स्टार्स देखील दिसणार आहेत. जवाननंतर राजकुमार हिरानीचा डंकी हा एसआरकेचा पुढचा चित्रपट असेल. या हलक्याफुलक्या चित्रपटात हिराणीच्या सर्व चित्रपटांप्रमाणेच महत्त्वाचा संदेश असेल. डंकीमध्ये तापसी पन्नूही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एटली कुमार आणि राजकुमार हिराणी हे दोन एकमेव दिग्दर्शक आहेत ज्यांचा आजपर्यंत एकही चित्रपट फ्लॉप झालेला नाही. चार वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शाहरुखचा पठाण हा चित्रपट यावर्षी रिलीज झाला आणि त्याला घवघवीत यश मिळाले होते. यामुळे त्याचे स्टारडम त्याला परत मिळाले आहे.
हेही वाचा - Kriti Sanon Playing With Baby : इकॉनॉमी फ्लाइटमध्ये बाळासोबत खेळणाऱ्या क्रिती सेनॉनचा सुंदर व्हिडिओ व्हायरल