मुंबई : महिला दिनाची संकल्पना म्हणजे या दिवशी छोट्या छोट्या कार्यक्रमातून सर्व महिलांना त्यांच्यातील गुणांची जाणिव करून देणे हे महत्वाचे काम असते. तसेच, आपल्या विषयात ज्यांनी उल्लेखनीय कामे केले आहेत, त्यांना सन्मानित करून त्यांना एक बळ देण्याचे काम करणे गरजेचे आहे. महिलांनी आणखी उल्लेखनीय कार्य करावे असे प्रोहत्सान देणेही गरजेचे आहे अस म्हण स्मिता ठाकरे यांनी दिलखूलास गप्पा मारल्या आहेत.
आजही महिला सशक्तीकरणाचा नारा लावला जातो. मात्र आजही महिला सशक्त नाहीत का ? : मला वाटत बऱ्याच महिला सशक्त आहेत. मात्र, ग्रामीण भागातील महिलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरात मोठ्या प्रमाणात महिला सशक्तीकरणाकडे वळल्या आहेत. त्या महिलांनी ग्रामीण भागातील महिलांकडे जास्त लक्ष देण्याचे काम करायला हवे. ग्रामीण भागात लक्ष दिल्यास सर्वत्र महिला सशक्त होतील.
अहवालानूसार संशोधन करणाऱ्या महिलांचे प्रमाण समान होते ते 15 टक्के झाले आहे त्यावर काय सांगाल ? : मला आकडेवारींवर विश्वास नाही. माझ्या अजूबाजूला जे बघते त्यावरून मला वाटते की या आकड्यांवर विश्वास ठेवण्यासारखे नाही. मात्र, हे आकडे जर काही सांगत असतील तर त्यावर काम करणेही गरजेचे आहे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात वाव मिळायला हवा. पंतप्रधानांनी महिलांसाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्या योजनांच्या माध्यमातून काम केले तर हा आकडाही चांगला दिसेल.
महिलांच्या प्रगतिच्या आड पुरुषी मानसिकता येते का? : शेवटी प्रत्येक घरावर अवलंबून असेत. पुरुष आणि महिला हे काही युद्ध नाहीये. आता कित्येक ठिकाणी पुरुष महिलांना प्रत्येक कामात मदत करतात. शहरात प्रामुख्याने हा भेद आज दिसत नाही. ग्रामिण भागात शिक्षणाचा अभाव असल्याने हा भेद आहे. ग्रामीण भागात जावून याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे.
मुक्ती कल्चरल हब ही तुमची संस्था कशी काम करते ?: यामध्ये महिलांना शिक्षण देत असतो. यामध्ये महिला मार्शल म्हणून ट्रेन केले आहे. या महिलांना ट्रेनमध्येही ठेवण्यात आले होत. यामध्ये मारामारी करावी असे नाही. मात्र, त्यांना स्वत:ची काळजी घेता यावी हा उद्देश आहे. तसेच, लहान मुलींच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले आहे. यामध्ये अशा पद्धतीने काम चालत आहे. शेवटी वेळ काढला तर समाजसेवाही करता येते. कितीतरी महिलांना प्रश्न पडतो कशी समाजसेवा करावी. त्यांनाही आम्ही मार्गदर्शन करतो.
ऑर्डिनरी हाऊस वाईफ या वेबसिरीजबद्दल काय सांगाल ?: लग्नाच्या अगोदर काम करत होते. तसेच, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी काम करावे लागते. तसेच, स्वत: 400 रुपयांवर नोकरी सुरू केली होती. त्यावेळी ते पैसेही खूप होते. तसेच, प्रत्येक व्यक्ती कशी असते. कोणती संस्था कशी असते या सर्व गोष्टींचा अनुभव येथे आला. स्वत: काम केल्यावर हा आत्मविश्वस मिळतो.
मंत्रिमंडळात एकही महिला नाही याबद्दल काय सांगाल ? : मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु, मुख्यमंत्र्यांनी अनेक विविध उपाययोजना सांगितल्या आहेत. त्या ते नक्कीच अंमलात आणतील. तसेच, ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा नक्कीच ते महिलांना मंत्रिमंळात स्थान देतील.
महिलांना काय संदेश द्याल? : संदेश देण्यासाठी मी काही मोठी नाही. परंतु, स्वत:चा विचार करा. होईल तितका वेळ स्वत:साठी घालवा. त्यासारखे मोठे काही नाही. स्वत:ला ओळखा.
हेही वाचा : Priyanka chopra on Citadel : इटालियन लोक सिटाडेलची भारतीय आवृत्ती पाहतील का? - प्रियांका चोप्रा