ETV Bharat / entertainment

Allu arjun And Ramcharan : रामचरण आणि उपासनाने राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल अल्लू अर्जुनचं केलं अभिनंदन... - राम चरण आणि उपासना दिले सरप्राईज

अल्लू अर्जुनने नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. सध्या तेलुगु चित्रपटसृष्टीत याबाबत आनंद साजरा केला जात असून भाऊ राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाने देखील एक सरप्राईज दिलं आहे. काय आहे सरप्राईज हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचाच...

Allu arjun And Ramcharan
अल्लू अर्जुन आणि राम चरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 6:39 PM IST

मुंबई : अल्लू अर्जुनला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जुनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. २०२१ चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज' मधील त्याच्या तडफदार अभिनयासाठी त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तेलुगु चित्रपटसृष्टीत याबाबत आनंद साजरा केला जात आहे. राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा तो पहिला तेलुगु स्टार बनला आहे. अल्लू अर्जुनच्या विजयाचा आनंद साजरा करत चुलत भाऊ राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाने त्याला एक सरप्राईज दिले आहे.

राम चरण आणि उपासनाने दिले सरप्राईज : राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी अल्लू अर्जुनला फुलांसह एक सुंदर चिठ्ठी पाठवली. अल्लू अर्जुनला राम चरणकडून असं प्रेम आणि भेटवस्तू मिळाल्याने तो खूप आनंदी झाला. त्यानंतर त्यानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या भेटवस्तूचा एक फोटो शेअर करत लिहिले, 'खूप खूप धन्यवाद'. दरम्यान आता अल्लू अर्जुनचे चाहते त्याच्या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. आजकाल अल्लू अर्जुन हा 'पुष्पा' चित्रपटाच्या सीक्वलच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे, ज्याचे नाव 'पुष्पा: द रुल' आहे. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता. याशिवाय या चित्रपटातील गाणंही खूप हिट झालं होतं. आता अल्लू अर्जुन पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री करणार आहे. 'पुष्पा २'मध्ये तो एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अल्लू अर्जुन झाला भावूक : सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी अल्लू अर्जुनच्या नावाची घोषणा होताच तो भावूक झाला होता. तेव्हा तो निर्माता सुकुमारसोबत होता आणि त्याने यावेळी त्यांना मिठी मारली. त्यानंतर त्याने आपली पत्नी स्नेहा रेड्डीला आणि मुलांना मिठी मारली. यावेळी अनेक लोकही उपस्थित होते आणि त्यांनी अल्लू अर्जुनसोबत हा आनंद साजरा करत त्याचं अभिनंदन केलं.

हेही वाचा :

  1. Rajinikanth : रजनीकांतने 'जेलर'च्या क्रूसह यशाचा आनंद केला साजरा...
  2. Gadar 2 vs OMG 2 box office collection day 15 : रिलीजच्या १५व्या दिवशी 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २'च्या कमाईचा वेग मंदावला...
  3. Malaika Arjun Breakup : मलायका आणि अर्जुनचा ब्रेकअप? वाचा काय म्हणाली रिलेशनमध्ये ट्विस्ट आणणारी कुशा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.