ETV Bharat / entertainment

Allu Sirish : अल्लू सिरिशने बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर केला शेअर - South superstar Allu Arjun

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा भाऊ आणि अभिनेता अल्लू सिरिशने नुकताच बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. निर्माते मधु मंटेना आणि इरा त्रिवेदी यांच्या लग्नात घेतलेल्या या फोटोद्वारे त्याने आमिरसोबत घालवलेल्या खास वेळेच्या आठवणी सांगितल्या आहे.

Allu Sirish
अल्लू सिरिश
author img

By

Published : Jun 27, 2023, 10:43 AM IST

मुंबई : नुकतेच निर्माते मधु मंटेना आणि योग शिक्षिका इरा त्रिवेदी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाला बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हृतिक रोशन, आमिर खान, कार्तिक आर्यन, सारा अली खान यांसारखे स्टार्स बॉलीवूडमधून आले होते, याशिवाय या लग्नात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन त्याचा भाऊ अभिनेता अल्लू सिरिश यांनी देखील हजेरी लावली होती.

अल्लू सिरिश शेअर केला फोटो : आता नुकताच सिरिशने आमिर अल्लूसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शन लिहिले, 'मधू मंटेना आणि इरा त्रिवेदीच्या लग्नासाठी आभारी आहे जिथे मला आमिर खान सरांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. फक्त त्याच्या आजूबाजूला असणे हा एक शिकण्याचा अनुभव आहे. मी सरांना आणि त्यांच्यासोबतच्या माझ्या प्रवासाबद्दल आणि तपशीलवार माहिती देऊ शकतो, परंतु मी ते दुसर्‍या दिवसासाठी जतन करेन. हे फोटो पोस्ट करण्यापासून मी स्वतःला बरेच दिवस थांबवले पण आता माझा आतला चाहत्याला फार काळ मी थांबवू शकलो नाही.

अल्लू सिरिश झळकणार 'बडी' चित्रपटात : सिरिश हा दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता असून तो सुपरस्टार अल्लू अर्जुनचा भाऊही आहे. तसेच दुसरीकडे, अल्लू सिरिशचे वडील अल्लू अरविंद हे दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माते आहेत.अल्लू हा प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम करतो, त्याचा मागील चित्रपट 'उर्वसिरो राक्षसशिवो' होता जो रोमँटिक मनोरंजन करणारा होता. दरम्यान तो आगामी 'बडी' या चित्रपटात दिसणार आहे जो ड्रामा-अ‍ॅक्शन-कॉमेडीने परिपूर्ण असणार आहे.

अल्लू सिरीशची अभिनय करण्याची इच्छा नव्हती : अल्लू सिरीशला चित्रपटांमध्ये दिसण्याची फारशी इच्छा नव्हती, मात्र त्याच्या कुटुंबात १० तेलुगू सुप्परस्टार असल्याने त्याने अभिनय करण्याचा निर्णय घेतला. त्याने 2013 मध्ये 'गौरवम' या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर त्याने 2014 मध्ये 'कोठा जनता', 2016 मध्ये 'सरीरस्तु सुभमस्तु' आणि 2017 मध्ये ओक्का क्षनम या सिनेमांमध्ये काम केले. अल्लू अर्जुनला जी प्रसिद्धी मिळाली ती त्याला मिळवता आली नाही, मात्र आता देखील तो प्रयत्न करत आहे.

कुटुंबात १० तेलुगू सुप्परस्टार : अल्लू सिरिशच्या कुटुंबात एक-दोन नव्हे तर 10 हून अधिक कलाकार आहेत. सध्याला राम चरण आणि अल्लू अर्जुन हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले कलाकार आहेत. निर्माते अरविंद अल्लू यांचा मुलगा अल्लू सिरिश याचे आजोबा देखील एक उत्तम विनोदी अभिनेता होते. ज्यांचे नाव अल्लू रामलिंगय्या होते. तसेच चिरंजीवी हे त्याचे काका आहेत. अशा बड्या स्टार्सच्या कुटुंबातील अल्लू सिरीश एका मोठ्या हिटची सध्याला वाट पाहत आहे.

हेही वाचा :

  1. Arjun kapoor birthday : अर्जुन कपूरला वाढदिवसानिमित्याने गर्लफ्रेंन्ड मलायका अरोराने दिल्या शुभेच्छा...
  2. YouTuber Devraj Patel : 'दिल से बुरा लगता है भाई' फेम युट्यूबरचे अपघाती निधन
  3. Arjun Kapoor birthday : गरिब मुलांच्या मदतीसाठी अर्जुन कपूर करणार आवडत्या कपड्यांचा लिलाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.