मुंबई - Varun-Lavanya Photos: मेगास्टार चिरंजीवीचा भाचा आणि साऊथ स्टार वरुण तेज आज लग्नबंधनात अडकणार आहे. वरुण हा अभिनेत्री लावण्या त्रिपाठीसोबत दीर्घकाळपासून रिलेशनशिपमध्ये होता. आता या जोडप्यानं त्यांच्या नात्याचे लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीच्या जून महिन्यात या दोन्ही स्टार्सनं मोठ्या थाटामाटात साखरपूडा केला होता. हे स्टार कपल इटलीतील टस्कनीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नापूर्वी वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा हळदी समारंभ पार पडला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये हे जोडपे खूप खूश दिसत आहे.
-
Radiant smiles and joyous moments at @IAmVarunTej and @Itslavanya Haldi ceremony ✨
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) October 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Surrounded by close family and friends, the couple embraced this beautiful tradition, marking the beginning of their journey together. #VarunLav pic.twitter.com/MWhnhIRjJ5
">Radiant smiles and joyous moments at @IAmVarunTej and @Itslavanya Haldi ceremony ✨
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) October 31, 2023
Surrounded by close family and friends, the couple embraced this beautiful tradition, marking the beginning of their journey together. #VarunLav pic.twitter.com/MWhnhIRjJ5Radiant smiles and joyous moments at @IAmVarunTej and @Itslavanya Haldi ceremony ✨
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) October 31, 2023
Surrounded by close family and friends, the couple embraced this beautiful tradition, marking the beginning of their journey together. #VarunLav pic.twitter.com/MWhnhIRjJ5
वरुण तेज-लावण्या त्रिपाठी हळदी समारंभाचे फोटो : हळदी समारंभाची थीम पिवळा रंग आहे. या समारंभाचा ड्रेस कोड पिवळा, गुलाबी आणि पांढरा होता. वरुण चमकदार पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. तर लावण्यानं पिवळ्या रंगाची चोली आणि पांढऱ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. फोटोमध्ये हे कपल एकमेकांच्या डोळ्यात मग्न झालेले दिसत आहेत, तर इतर फोटोंमध्ये त्यांचे नातेवाईक गार्डन परिसरात बसून कॅमेरासाठी पोझ देताना दिसत आहेत. याशिवाय आणखी दोन फोटोमध्ये साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी आणि त्याची पत्नी सुरेखा वधू-वरांना आशीर्वाद देत आहेत. वरुण आणि लावण्य लग्नात मनीष मल्होत्राचा डिझाईन केलेला पोशाख परिधान करणार आहेत.
-
Megastar @KChiruTweets & Surekha garu at the Haldi ceremony✨ of @IAmVarunTej & @Itslavanya 🎊 in Italy.
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) October 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Wedding will be held Tomorrow at 2.48 PM IST.#VarunLav pic.twitter.com/jIt6p5K8mV
">Megastar @KChiruTweets & Surekha garu at the Haldi ceremony✨ of @IAmVarunTej & @Itslavanya 🎊 in Italy.
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) October 31, 2023
Wedding will be held Tomorrow at 2.48 PM IST.#VarunLav pic.twitter.com/jIt6p5K8mVMegastar @KChiruTweets & Surekha garu at the Haldi ceremony✨ of @IAmVarunTej & @Itslavanya 🎊 in Italy.
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) October 31, 2023
Wedding will be held Tomorrow at 2.48 PM IST.#VarunLav pic.twitter.com/jIt6p5K8mV
मिळालेल्या माहितीनुसार लावण्याचा लग्नाचा पोशाख हा 'पेस्टल' कलरचा असणार आहे. हळदी समारंभानंतर पूल पार्टी झाली होती. पूल पार्टीनंतर, मेहंदी समारंभ झाला आहे. या कार्यक्रमाचे फोटो देखील सध्या व्हायरल होत आहेत. याशिवाय हे जोडपे ५ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करणार असल्याचं बोललं जात आहे. दोघेही इटलीत १ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २.४८ वाजता लग्नबेडीत अडकणार आहेत. वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांच्या लग्नाचे विवाहपूर्व विधी जोरदार सुरू आहेत. त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित आहेत. हे एक भव्य डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे.
हेही वाचा :