मुंबई - करवा चौथच्या निमित्ताने उत्तर भारतातील अनेक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असताना बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपी, पंजाब, बिहारमध्ये अशा महिलांसाठी केंद्रे सुरू करण्याबद्दल पुढाकार घेणार आहे. सोनू नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी धावून येत असतो, याची प्रत्यय कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर आला होता.
आता भारतातील महिलांसाठीच्या या खास सणानिमित्त तो त्यांच्यासाठी पुढे आला आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, "मला ही केंद्रे आता काही काळासाठी उघडायची होती. या महिलांना स्वत:ला सक्षम करण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याची कल्पना आहे. देशाच्या प्रगतीसाठी आणि महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी सक्षम असणे खूप महत्त्वाचे आहे. "
त्यांनी पुढे सांगितले की, महिलांना कामाच्या चांगल्या संधी आणि विशेषत: ज्यांना त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कमावायचे आहे त्यांच्यासाठी कौशल्ये शिकण्यास मदत करून त्यांना मदत करायची आहे. "अनेकदा, आम्ही अशी कुटुंबे पाहतो जिथे महिलाच एकमेव कमावते आहेत, मला त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करायची आहेत," असे सोनू पुढे म्हणाला.
हेही वाचा - 'माँ भारती के सपूत'चे गुडविल अॅम्बेसेडर बनले अमिताभ बच्चन