ETV Bharat / entertainment

पतीसोबत 'बेबीमून'वरून परतलेल्या सोनम कपूरने शेअर केला आनंदी व्हिडिओ - Happy Video shared by Sonam

अभिनेत्री सोनम कपूर आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे. अलिकडेच इटलीहून भारतात पतीसह परतलेल्या सोनमने वाढदिवसापूर्वी एक आनंदी व्हिडिओ शेअर केला आहे.

सोनम कपूरने शेअर केला आनंदी व्हिडिओ
सोनम कपूरने शेअर केला आनंदी व्हिडिओ
author img

By

Published : Jun 8, 2022, 10:41 AM IST

मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. इटलीमध्ये 'बेबीमून' एन्जॉय करणारी सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा आता मायदेशी परतले आहेत. आज ती आपला वाढदिवस उत्साहाने साजरा करीत आहे. मंगळवारी तिने सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या पतीसोबतचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे.

सोनमने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पती आनंद आहुजासोबतचा एक सुंदर व्हिडिओ टाकला, ज्यामध्ये तिने लिहिले, "घरी परतली आहे.. वाढदिवसाचा आठवडा सुरू होत आहे!"

चाहत्यांनी या जोडप्यावरील त्यांचे प्रेम हार्ट इमोटिकॉनसह भरपूर कमेंट्सचा वर्षाव करुन व्यक्त केले आहे. सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या सोशल मीडिया हँडलवर वारंवार तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना फोटो आणि व्हिडिओज अपडेट करत असते.

2018 च्या उन्हाळ्यात सोनमने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले होते. लग्नाच्या सहा वर्षांपूर्वी हे जोडपे 2016 मध्ये भेटले आणि त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी घोषणा केली होती की ते पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, सोनम पुढे 'ब्लाइंड' चित्रपटात दिसणार आहे, ज्यात पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2011 च्या त्याच नावाच्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. कलाकारांनी फेब्रुवारी 2021 मध्ये चित्रीकरण पूर्ण केले आहे.

हेही वाचा - पॅरिसमध्ये 'बवाल': वरुण धवनने जान्हवी कपूरसोबत शेअर केली मजेशीर झलक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.