लंडन (यूके) - कॉमनवेल्थच्या विविध गायक कलाकारांची ओळख करून देण्यासाठी अभिनेत्री सोनम कपूर कॉरोनेशन कॉन्सर्टच्या भव्य मंचावर अवतरली होती. तिने कॉमनवेल्थच्या ५६ देशातील गायक, सोलो परफॉर्मन्स आणि जोडीने गाणारे गायक यांची ओळख करुन दिली. या भव्य ऐतिहासिक कॉन्सर्टमध्ये प्रेक्षक म्हणून सहाभागी होणेही लोक भाग्य समजतात, अशा या सोहळ्यात सोनम कपूर चक्क स्टेजवर उपस्थित होती. अतिशय आत्मविश्वासाने तिने उपस्थित आंतरराष्ट्रीय गायकांचे स्वागत केले आणि त्यांना सोहळ्यात आमंत्रीत करुन त्यांचा परिचयही करुन दिला.
सोनम कपूरची नमस्ते म्हणत सुरुवात - या कार्यक्रमादरम्यान सोनमने स्टीव्ह विनवूडची ओळख करून दिली. स्टीव्ह विनवूडने 70-पीस ऑर्केस्ट्रासह त्याच्या आयकॉनिक गाण्याचे हायर लव्हचे आधुनिक परफर्मन्सचे सादरीकरण केले. सोनमने आपल्या भाषणाची सुरुवात 'नमस्ते' ने केली. बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिची ओळख झाली. सोनमने तिच्या उच्चारलेल्या शब्द प्रदर्शनादरम्यान राष्ट्रकुलच्या विविधतेवर भर दिला. राष्ट्राच्या विविधतेला जोडणाऱ्या एकतेवरही तिने आपल्या भाषणात खास उल्लेख केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सोनमचा अभिमानास्पद व्हिडिओ तिच्या आईने शेअर केला - सोनमचा व्हिडिओ तिची आई सुनीता कपूरने शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'खूप अभिमान आहे! इतका सन्मान!' सोनमनेही तिच्या पोस्टला 'लव्ह यू' म्हणत हार्ट इमोजीसह उत्तर दिले. सोनमच्या घरच्यांनीतिचे जोरदार कौतुक केले. संजय कपूर, अर्जुन कपूरपासून ते महीप कपूर आणि भावना पांडे यांनीही सोनमच्या आईच्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. उत्कृष्ट आणि सुंदर बार्डॉट गाऊन परिधान केला होता. यासाठी तिने कमीतकमी मेकअप करत साधेपणाचे प्रदर्शन केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फॅशनिस्टा सोनमचा साधेपणा - इंस्टाग्रामवर सोनम कपूरने खास फोटोशूटमधील फोटोंची स्ट्रिंग शेअर केली. सेटच्या पहिल्या फोटोत सोनमचा क्लोज-अप पोर्टफोलिओ आहे, तर इतर वेगवेगळ्या कोनातून तिचा सुंदर पोशाख दाखवला आहे. आवडत्या अनामिका खन्ना आणि एमिलिया विकस्टेड यांनी डिझाइन केलेला हा सुंदर ट्रेस सोनमने परिधान केला होता. ऐतिहासिक अशा या कोरोनेशन कॉन्सर्टमध्ये केवळ प्रेक्षक म्हणून नाही तर मंचावरुन उपस्थितांचे मने सोनमने जिंकली.