ETV Bharat / entertainment

अभिनेता सोहम चाकणकर चे ‘तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण! - सोहम चाकणकर

निर्माते राजू तोडसाम, ऋषभ कोठारी व सागर जैन निर्मित, जैन फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित 'तू आणि मी, मी आणि तू' या चित्रपटातून सोहम चाकणकर ( Soham Chakankar ) हा नवोदित नट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोहम हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांचा मुलगा असून त्याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेता सोहम चाकणकर
अभिनेता सोहम चाकणकर
author img

By

Published : Apr 14, 2022, 9:00 PM IST

मुंबई - निर्माते राजू तोडसाम, ऋषभ कोठारी व सागर जैन निर्मित, जैन फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित 'तू आणि मी, मी आणि तू' या चित्रपटातून सोहम चाकणकर ( Soham Chakankar ) हा नवोदित नट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोहम हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांचा मुलगा असून त्याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळे ठरत प्रेमाला आपलसे केले, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट. निखळ प्रेमासोबत जर मैत्रीही जोपासली तर आयुष्य अगदी खुलून जाते. मात्र, समाजातल्या काही अघोरी कृत्यांमुळे काहींना आपले प्रेम गमवावे लागत अशाच काहीशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात अभिनेता सोहम चाकणकर सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात कायम पाठीशी राहणाऱ्या रुपाली चाकणकरांचा मुलगा पडद्यावर आपल्या आईचे कार्य पुढे नेताना दिसेल.

या चित्रपटाची कथा रोमँटिक असून सोहम या चित्रपटात गणेश नावाच्या समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारणार आहे. शिवाय सोहमचा रोमँटिक अंदाजही या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोहम चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दल बोलताना असे म्हणाला की, “अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मला आमच्या चित्रपटाचे निर्माते सागर जैन यांनी दिली आणि दिग्दर्शक कपिल सरांनी मला दिलेले प्रोत्साहन यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. शूटिंगला आल्यानंतर मला आमच्या टीमने खूप सपोर्ट केले. ज्यामुळे मला एकदाही मी या क्षेत्रात नवीन आहे याची जाणीव भासली नाही. मला कपिल सरांनी घेतलेल्या वर्कशॉपमधून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनांमधून बरेच काही नव्याने शिकता आले आणि माझा अभिनयाबाबतीतचा रस वाढत गेला, 'तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटाची कथा रोमँटिक आणि फ्रेश असल्याने काम करायला मज्जा आली. या क्षेत्रात मला बरीच उंची गाठायची आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे.”

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “सर्वप्रथम मी असे सांगेन की सोहमला मिळालेल्या या संधीमागे पूर्णतः श्रेय त्याचेच आहे, माझा यात काहीच वाटा नाही. उलट त्याचा हा निर्णय ऐकून मी आश्चर्यचकित झाले होते आणि नंतर आनंदित. आमच्या कुटुंबात कोणी अद्याप या क्षेत्रात नाही. सोहम वेगळे क्षेत्र निवडून त्यात कामगिरी करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोहमच्या मागे कायम आहेतच, आणि नक्कीच आशा आहे की, त्याने निवडलेल्या या क्षेत्रात तो त्याचे नाव कमावेल.” सोहम चाकणकर सोबत ‘तू आणि मी, मी आणि तू' या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - Alia Ranbir Wedding : पाहा आलिया रणबीरच्या लग्नसोहळ्याची खास क्षणचित्रे...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.