मुंबई : मणिरत्नमच्या मॅग्नम ऑपस पोन्नियिन सेल्वन १ आणि २मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली अभिनेत्री शोभिता धुलिपाला, तिची वेब सीरिज 'द नाईट मॅनेजर पार्ट 2'च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. अलीकडेच एका मुलाखतीत तिला तिचे सुरुवातीचे दिवस आठवले त्यानंतर सुरूवाचे दिवसाची आठवण करत तिने शेअर केले की, ऑडिशन्स दरम्यान, तिला सांगण्यात आले की ती अभिनय करण्यासाठी, विशेषतः जाहिरातींमध्ये देखील काम करण्यास योग्य नाही.
मुलाखत : पोनियिन सेल्वन १ आणि २ मधील वानथीच्या भूमिकेसाठी शोभिताला फार कौतुक मिळाले होते. या वर्षाच्या सुरुवातीला, ती 'द नाईट मॅनेजर पार्ट १ 'मध्ये अनिल कपूरच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली, आणि आता ती दुसऱ्या सीझनमध्ये तिची भूमिका पुन्हा साकारणार आहे. दरम्यान, तिच्या ऑडिशनच्या दिवसांमध्ये, तिच्यासाठी सर्व काही चांगले नव्हते असे तिने सांगितले. जाहिरात ऑडिशन्स दरम्यान तिला 'नॉट गोरी (फेअर)' आणि 'नॉट प्रिटी असे म्हटले गेले होते तू अभिनयासाठी पुरेशी नाही असे तिला सांगितले होते.
अभिनयसाठी योग्य नाही : पुढे तिने म्हटले, 'जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करता तेव्हा सर्व काही एक लढाई असते. मी चित्रपटासाठी योग्य नाही. मला माझ्या जाहिरात ऑडिशन दरम्यान अनेक वेळा सांगितले गेले होते की मी पुरेशी 'गोरी' नाही. मला थेट सांगितले गेले. माझा चेहरा सुंदर नाही, तुम्ही जाहिरातींसाठी योग्य नाही. मला असे वाटत होते खरचं मी अभिनयासाठी योग्य आहे की नाही त्यानंतर मी उदास झाले होते.
मिस इंडिया अर्थचा ताज : तिने पुढे सांगितले की मी यावर लक्ष न देता इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याचे नवीन आणि कल्पक मार्ग शोधले. तिने पुढे सांगितले, 'तेव्हा मी एखाद्या यशस्वी व्यावसायिक चित्रपट निर्मात्याची वाट पाहत बसली नाही. मी बॉक्सच्या बाहेर विचार करायला लागले होते. ऑडिशनसाठी जाणे आणि माझे १०० टक्के देणे हे माझ्या हातात होते.' शोभिता धुलीपालाला २०१३ मध्ये मिस इंडिया अर्थचा ताज मिळाला होता आणि तिने हिंदी, मल्याळम, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. नागा चैतन्यसोबतच्या कथित अफेयरमुळे ती चर्चेत आली होती. तसेच शोभिता अमेरिकन चित्रपट मंकी मॅनमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :