मुंबई : आज पहाटे इमारतीच्या पायऱ्यांवरून पडल्यानंतर गायक जुबिन नौटियाल (Singer Jubin Nautiyal) याचा कोपर मोडला (broke his elbow) आणि बरगडी तुटली (cracked his ribs) आहे. तसेच डोक्याला दुखापत (hurt his head) झाली. त्याला नुकतेच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या उजव्या हाताचे ऑपरेशन केले जाईल, अशी माहिती जुबिन नौटियाल याचा जनसंपर्क सांभाळणाऱ्यांनी दिली आहे. Singer Jubin Nautiyal Injured
उजव्या हातावर शस्त्रक्रिया : बॉलिवूडमध्ये सुपरहिट गाणी देणारा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल याच्याबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रत्यक्षात जुबिन नौटियाल गुरुवारी घरातील पायऱ्यांवरून खाली पडला, त्यामुळे गंभीर जखमी झाला. पायऱ्यांवरून पडताना जुबिन नौटियाल याला कोपर आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे. याशिवाय त्यांच्या डोक्याला आणि कपाळावरही जखमा झाल्या आहेत. तर जुबिन नौटियाल याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉक्टरांनी त्याला उजवा हात न वापरण्याचा सल्ला दिला आहे.
चाहते करत आहे प्रार्थना : गायक जुबिन नौटियालने आपल्या आवाजाच्या जोरावर भारतीयांच्या हृदयात स्वतःचे स्थान पक्के बनवले आहे. नुकतेच जुबिन नौटियालचे तू सामने आये, हे गाणे रिलीज झाले. हे गाणे योहानीसह जुबिन गायले होते. गुरुवारी, नौटियाल आणि योहानी गाण्याच्या लाँचच्या वेळी एकत्र दिसले होते. यानंतरच त्याला ही दुखापत झाली. आपल्या आवाजाने जादू पसरविणारा गायक त्याचे चाहते जास्त वेळ रुग्णालयात बघु शकत नाहीत. त्यामुळे तो लवकर बरा व्हावा, अशी ते प्रार्थना सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. Singer Jubin Nautiyal Injured