ETV Bharat / entertainment

Sidharth Kiara Wedding : सिद्धार्थ कियाराच्या लग्नाला हे स्टार्स हजेरी लावतील, पाहा पाहुण्यांची यादी

author img

By

Published : Feb 5, 2023, 6:51 AM IST

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. बॉलीवूडच्या या सुंदर जोडप्याच्या लग्नाला अनेक खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. येथे वाचा पाहुण्यांची यादी..

Sidharth Kiara
सिद्धार्थ कियारा

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी 6 फेब्रुवारीला राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. त्यांच्या लग्नाला चित्रपट क्षेत्रातील पाहुण्यांसह सुमारे 150 व्हीव्हीआयपी गेस्ट लग्नाला उपस्थित राहणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थ आज जैसलमेरला पोहोचले आहेत.

व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास व्यवस्था : सूर्यगढ हॉटेलमध्ये लग्नाची तयारी सुरू झाली आहे. लग्नाला आमंत्रित करण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, मुंबईतील वेडिंग प्लॅनर कंपनी ही सर्व व्यवस्था पाहत आहे. सूर्यगड हॉटेल जैसलमेरपासून 16 किमी अंतरावर आहे. डिसेंबर 2010 मध्ये जयपूरच्या एका व्यावसायिकाने हे हॉटेल बनवले होते. सुमारे 65 एकर परिसरात पसरलेले हे हॉटेल जैसलमेरच्या पिवळ्या दगडांनी बनवलेले आहे. हे हॉटेल डेस्टिनेशन वेडिंगसाठी जगभर प्रसिद्ध आहे.

हे पाहुणे लग्नाला हजेरी लावणार : सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला फॅशन डिजायनर मनीष मल्होत्रा, दिग्दर्शक ​​करण जोहर, रोहित शेट्टी, अभिनेत्री ईशा अंबानी, दाक्षिणात्य अभिनेता रामचरण, बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, वरुण धवन, विकी कौशल, कतरिना कैफ इत्यादी स्टार्स पोहचणार आहेत. या दोघांच्या लग्नाला अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे देखील उपस्थित राहणार आहेत.

सात फेऱ्यांसाठी खास जागा : सूर्यगढ पॅलेसमध्ये 'बावडी' नावाची खास जागा आहे, जिथे कियारा आणि सिद्धार्थ सात फेरे घेतील. या दोघांच्या विवाह सोहळ्यासाठी ही जागा खास तयार करण्यात आली असून, मंडपाभोवती चार खांब लावण्यात आले आहेत. हॉटेलमध्ये तलावाजवळ 2 मोठ्या बागा आहेत. हॉटेलचे मोठे अंगण संगीत, हळदी समारंभ आणि मेहंदीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते. लग्नाचे विवाहपूर्व विधी ४ व ५ फेब्रुवारीला होणार आहे.

दोघांचे बऱ्याच दिवसांपासून अफेयर : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचे चाहते खूप दिवसांपासून त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते. या दोघांच्या अफेअरच्या बातम्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर गाजत होत्या. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या शेवटच्या सीझनमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा वेगवेगळ्या एपिसोडमध्ये दिसले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.

हेही वाचा : Anushka and Virat Trekking : अनुष्का आणि विराटची लाडक्या लेकीसोबत ट्रॅकींग, निसर्गाचा घेतला आनंद; सुंदर फोटो केले शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.