ETV Bharat / entertainment

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीनं ख्रिसमस सेलिब्रेशनची केली झलक शेअर - सिद्धार्थ कियारा ख्रिसमस सेलिब्रेशन

Sidharth malhotra and kiara advani : कियारा अडवाणीनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक सुंदर ख्रिसमस ट्री दिसत आहे.

sidharth malhotra and kiara advani
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 7:01 PM IST

मुंबई - sidharth malhotra and kiara advani : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दरम्यान कियारा अडवाणीनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ख्रिसमस ट्रीची झलक शेअर केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये या जोडप्यानं लग्न केलं होतं. आता हे जोडपे त्यांचा पहिला ख्रिसमस साजरा करणार आहेत. यावर्षी सिद्धार्थ-कियारानं आपल्या कुटुंबासोबतचे अनेक सणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ख्रिसमस जवळ येत असताना, तिनं ख्रिसमस ट्रीची झलक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'धन्यवाद , मला खूप खूप आवडलं'.

sidharth malhotra and kiara advani
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट : सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि कियारा अडवाणी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकादा ते आपले फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्याच्या फोटोवर अनेकजण कमेंट करून या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत असताना दिसतात .सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि कियारा अडवाणीची फॅन फॉलोइंग खूप आहे. सिद्धार्थ हा सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'योद्धा'मुळं चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत दिशा पटानी, राशी खन्ना, अमित सिंह ठाकूर, नवीन सिंग, शारिक खान आणि इतर कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 मार्च 2024 रोजी रिलीज होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी केलं आहे. 'योद्धा' चित्रपटाचे निर्माते करण जोहर, हिरू जोहर, शशांक खेतान हे आहेत. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा ​लवकरच रोहित शेट्टीच्या पहिल्या वेब-प्रोजेक्ट, 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

कियारा अडवाणीचे आगामी चित्रपट : कियारा अडवाणी शेवटची रोमँटिक ड्रामा, 'सत्यप्रेम की कथा'मध्ये कार्तिक आर्यन सोबत दिसली होती. समीर संजय विद्वान दिग्दर्शित या चित्रपटात कियारा मुख्य भूमिकेत होती. याशिवाय ती साऊथ स्टार राम चरणसोबत आगामी चित्रपट 'गेम चेंजर'मध्ये दिसणार आहे. पुढं ती रणवीर सिंगसोबत 'डॉन 3'मध्ये दिसेल.

हेही वाचा :

  1. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्या घरी हलला पाळणा; दिला जुळ्या मुलींना जन्म
  2. पुष्पा फेम जगदीश प्रताप भंडारीला अटक, तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा केला कबूल
  3. श्रेयस तळपदेच्या तब्येतीत सुधार; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.