ETV Bharat / entertainment

Sidharth - Kiara New Home : सिद्धार्थ आणि कियारा यांच्या मुंबईतील नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल - कियारा अडवाणी

नवविवाहित जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या नवीन घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओनुसार, सिद्धार्थ-कियाराने मुंबईतील नायर हाउस अपार्टमेंटमध्ये त्यांचे नवीन घर घेतले आहे. सिद्धार्थ आणि कियारा 12 फेब्रुवारी 2023 (रविवार) रोजी त्यांच्या बॉलिवूड मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करतील, ज्यामध्ये सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन, भूषण कुमार, मीरा राजपूत, शाहिद कपूर, करण जोहरसह इतर चित्रपटातील कलाकार दिसणार आहेत.

Sidharth - Kiara New Home
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या मुंबईतील नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : Feb 12, 2023, 9:40 AM IST

मुंबई : दिल्लीत भव्य रिसेप्शन आयोजित केल्यानंतर, नवविवाहित जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी शनिवारी मुंबईत पोहोचले. मुंबईतील कलिना एअरपोर्टवर कपल स्पॉट झाले. रिपोर्टनुसार, सिद्धार्थ-कियारा आज (12 फेब्रुवारी रोजी) मुंबईत दुसरे ग्रँड रिसेप्शन आयोजित करणार आहेत, ज्यामध्ये इंडस्ट्रीतील लोक उपस्थित असतील. त्याचवेळी पापाराझींनी सिद्धार्थ आणि कियाराच्या मुंबईतील नवीन घराचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिद्धार्थ आणि कियाराचे नवीन घर : व्हायरल व्हिडिओनुसार, ही तीच इमारत आहे ज्यामध्ये सिद्धार्थ आणि कियारा यांचे नवीन अपार्टमेंट आहे. या व्हिडिओमध्ये पापाराझी एका माणसाला विचारतात की, सिद्धार्थ आणि कियाराने हे घर कधी खरेदी केले? ज्याला ती व्यक्ती उत्तर देते, 'एक आठवडा झाला.' सिद्धार्थ आणि कियारा यांनी मुंबईतील नायर हाऊस अपार्टमेंटमध्ये त्यांचे नवीन घर घेतले आहे, जिथे ते त्यांचे नवीन आयुष्य सुरू करणार आहेत.

रिसेप्शनमध्ये येणारे स्टार गेस्ट : सिद्धार्थ आणि कियारा 12 फेब्रुवारी 2023 (रविवार) रोजी त्यांच्या बॉलिवूड मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करतील, ज्यामध्ये सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन, भूषण कुमार, मीरा राजपूत, शाहिद कपूर, करण जोहरसह इतर चित्रपटातील कलाकार दिसणार आहेत. कियारा-सिद्धार्थ त्यांच्या मुंबईतील घराबाहेर पापाराझींना भेटले आणि त्यांना मिठाईचे बॉक्स दिले. यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा ​​पांढऱ्या कुर्ता-पायजामामध्ये खूपच सुंदर दिसत होता. दुसरीकडे, कियारा पिवळ्या रंगाच्या अनारकलीत खूपच सुंदर दिसत होती. नववधूने सिंदूर आणि मंगळसूत्रही परिधान केले होते. नवविवाहित जोडप्याने पापाराझींसाठी पोज दिली आणि फोटोही काढले.

सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न बंधनात अडकले : सिद्धार्थ आणि कियारा 7 फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नाच्या एका दिवसानंतर, हे जोडपे दिल्लीला पोहोचले. तिथे सिद्धार्थ-कियारा यांचा ड्रमच्या तालावर हाऊसवॉर्मिंग झाला. सिद्धार्थ आणि कियारा यांनी 9 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील लीला पॅलेसमध्ये त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित केले होते.

दिल्लीत ग्रॅंड रिसेप्शन दिले : नवविवाहित जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी गुरुवारी रात्री दिल्लीत ग्रॅंड रिसेप्शन दिले. सिद्धार्थने दिल्लीत राहणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांसाठी हे रिसेप्शन आयोजित केले होते. लग्नानंतर एका दिवसाने सिद्धार्थ-कियारा पती-पत्नीच्या रुपात जैसलमेर विमानतळावर स्पॉट झाले. त्यानंतर ते कडेकोट बंदोबस्तात दिल्लीच्या 'द लीला पॅलेस'मध्ये पोहोचले. या वेळी हे जोडपे मीडियापासून अंतर राखताना दिसले. त्यावेळची त्यांची एक झलक कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गेल्या शुक्रवारी या जोडप्याने त्यांचा जयमालाचा सुंदर आणि रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये हे जोडपे रोमँटिक अंदाजात वरमालाचा सोहळा पूर्ण करताना दिसले. जयमालाचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हेही वाचा : Valentine Week : नवनीत राणा-रवी राणांची लव स्टोरी आहे एकदम खास, पाहा झक्कास फोटो..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.