मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्यांच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहेत. बातमीनुसार, दोघेही 6 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न करणार आहेत. लग्नाशी संबंधित कार्यक्रम सुरू झाले आहेत. नुकताच कियारा अडवाणीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ती तिच्या कुटुंबासोबत जैसलमेर विमानतळाबाहेर पडताना दिसली होती. तिच्या सोबत ड्रेस डिझायनर मनिष मल्होत्राही होता. विवाहपूर्व विधी ४ व ५ फेब्रुवारीला होणार आहेत. दरम्यान विवाह सोहळ्यासाठी सेलेब्रिटी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
-
cars waiting Groom #SiddharthMalhotra 🚗🤩 @viralbhayani77 pic.twitter.com/ESwmfhgtqx
— Viral Bhayani (@viralbhayani77) February 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">cars waiting Groom #SiddharthMalhotra 🚗🤩 @viralbhayani77 pic.twitter.com/ESwmfhgtqx
— Viral Bhayani (@viralbhayani77) February 4, 2023cars waiting Groom #SiddharthMalhotra 🚗🤩 @viralbhayani77 pic.twitter.com/ESwmfhgtqx
— Viral Bhayani (@viralbhayani77) February 4, 2023
जैसलमेर विमानतळाबाहेर आलिशान गाड्यांचा ताफा थांबला आहे. या सर्व गाड्या सिद्धार्थ आणि कियारा अडवणीच्या लग्नातील पाहुण्यांसाठी आहेत. आता एक एक करुन पाहुणे येत असून विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी संयोजकांनी व्यवस्था केली आहे. सुमारे १२५ निमंत्रीत पाहुणे यात सहभागी होणार अशी माहिती आहे.
अभिषेक बच्चन पत्नी व मुलीसह विमानतळावर स्पॉट - नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन त्याच्या कुटुंबासह विमानतळावर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत त्यांची मुलगी आराध्या बच्चनही दिसत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ पाहून युजर्सनी ते जैसलमेर येथे सिद्धार्थ कियाराच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी चालले असल्याचा तर्क लावला आहे. मात्र अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय मुंबई विमानतळावरुन कुठे निघून गेले आहेत याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचे चाहते खूप दिवसांपासून त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते. या दोघांच्या अफेअरच्या बातम्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर गाजत होत्या. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या शेवटच्या सीझनमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा, जे वेगवेगळ्या एपिसोडमध्ये दिसले होते, त्यांना त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. जेव्हा करण जोहरने कियाराला विचारले, तू सिद्धार्थसोबतचे नाते नाकारत आहेस का? तिचे उत्तर होते: मी नाकारत नाही किंवा स्वीकारत नाही. केजोने तिला विचारले, तू जवळच्या मैत्रिणी आहेस का? अभिनेत्री म्हणाली, जवळच्या मित्रांपेक्षा जास्त. तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल विचारले असता कियारा म्हणाली, मी माझ्या आयुष्यात ते पाहते आहे पण मी कॉफी विथ करणवर ते उघड करत नाही.