मुंबई - 'शेरशाह' चित्रपटाची गाजलेली जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये 7 फेब्रुवारी (मंगळवार) विवाह झाला. त्यानंतर लव्हबर्ड्सने त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले. या छायाचित्रांमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती. लग्नाच्या एका दिवसानंतर, सिद्धार्थ-कियारा पती-पत्नीच्या रुपात जैसलमेर विमानतळावर झळकले. जैसलमेर येथून ही जोडी दिल्लीला पोहोचली. दिल्ली विमानतळाबाहेर पापाराझींनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सिद्धार्थ आणि कियारा फोटोग्राफर्सना सामोरे गेले. त्यानंतर उपस्थित पापाराझींना मिठाईचे वाटपही केले. सर्व पापाराझींना उत्तम स्वादिष्ठ मिठाईचे वाटप सिद्धार्थ आणि कियाराने स्वतःच्या हाताने केले. यावेळी नवविवाहितांनी सर्वांचे मनापासून आभारही मानले.
-
what a grand welcome🥳#SidKiara pic.twitter.com/7e8fQkVz0t
— Manmarziyan | TEAM SIDKIARA (@mitwa_mir) February 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">what a grand welcome🥳#SidKiara pic.twitter.com/7e8fQkVz0t
— Manmarziyan | TEAM SIDKIARA (@mitwa_mir) February 8, 2023what a grand welcome🥳#SidKiara pic.twitter.com/7e8fQkVz0t
— Manmarziyan | TEAM SIDKIARA (@mitwa_mir) February 8, 2023
सिद्धार्थच्या घरी जोडप्याचे जोरदार स्वागत - सिद्धार्थ राहात असलेल्या बिल्डिंगला रोशनाईने सजवण्यात आले होते. सिद्धार्थचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र नवविवाहित जोडीच्या स्वागतासाठी उभे होते. जोरदार ढोल ताशाच्या गजरात सिद्धार्थ आणि कियाराचे स्वागत करण्यात आले. यावेळी मित्रांसह सिद्धार्थ आणि कियारानेही जोरदार डान्स करत सर्वांचा उत्साह वाढवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी याची कार घराजवळ येताना दिसते. त्यानंतर पहिल्यांदा सिद्धार्थ उतरतो व त्याला मित्र रिसिव्ह करतात. पाठोपाठ कियारा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये उतरते तेव्हा ढोल नगाऱ्याचा आवाज वाढू लागतो आणि नंतर एक जल्लोष झालेला दिसतो.
-
Oh my godddddddddddd 😭😭😭
— VD ˢᶦᵈᵏᶦᵃʳᵃʷᵃˡᵉ🤝❤️ (@Deepti_Vishwas) February 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
They're such a cutusssssss #SidKiara #SidKiaraWeddingpic.twitter.com/10BTarm9x6
">Oh my godddddddddddd 😭😭😭
— VD ˢᶦᵈᵏᶦᵃʳᵃʷᵃˡᵉ🤝❤️ (@Deepti_Vishwas) February 8, 2023
They're such a cutusssssss #SidKiara #SidKiaraWeddingpic.twitter.com/10BTarm9x6Oh my godddddddddddd 😭😭😭
— VD ˢᶦᵈᵏᶦᵃʳᵃʷᵃˡᵉ🤝❤️ (@Deepti_Vishwas) February 8, 2023
They're such a cutusssssss #SidKiara #SidKiaraWeddingpic.twitter.com/10BTarm9x6
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तयारी - गेल्या अनेक आठवड्यापासून सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तयारी सुरू होती. अगदी विवाहाची तारीख उलटली तरी अनेक गोष्टी माध्यमापासून लपवून केल्या जात होत्या. विवाह जैसलमेरच्या पॅलेसमध्ये करायचा इथपासून ते वऱ्हाडी सेलेब्रिटींची यादी बनवणे, सुरक्षा व्यवस्था, पाहुण्यांसाठी राहण्याची व्यवस्था, विवाहपूर्व विधीमध्ये जेवणाचे मेन्यू, परिधान करायची वस्त्रे व दागिने, सजावट, रोशनाई, संगीत कार्यक्रमाची रिहर्सल, डीजे, वादक आणि शेकडो गोष्टी यांचे नियोजन अतिशय काटेकोरपणे केले गेले.
सिड कियाराचे दोन भव्य रिसेप्शन - काल असे वृत्त आले होते की कियारा अडवाणीचा सिद्धार्थच्या दिल्लीतील घरी हाऊस वॉर्मिंग सेरेमनी होणार आहे. सिद्धार्थचे कुटुंब कियाराच्या घरी औपचारिक स्वागत करणार आहे. दरम्यान, हे जोडपे दोन भव्य रिसेप्शन एक दिल्लीत आणि दुसरे मुंबईत आयोजित करणार आहेत. लग्नाचे पहिले ग्रॅण्ड रिसेप्शन आज (9 फेब्रुवारी) दिल्लीत पार पडण्याची शक्यता आहे. यानंतर, सिद्धार्थ आणि कियारा 10 फेब्रुवारीला मुंबईला रवाना होतील, जिथे ते 12 फेब्रुवारीला फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांसाठी आणखी एक रिसेप्शन आयोजित करतील.