ETV Bharat / entertainment

Sid Kiara wedding look : सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणीचा स्वप्नवत लग्नाचा लुक - कॉफी विथ करण सीझन 7

सिद्धार्थ आणि कियाराचा शाही विवाह सोहळा जैसमेरमधील सुर्यगढ पॅलेसमध्ये पार पडला. यावेळी नवविवाहित जोडप्याने मनिष मल्होत्राने डिझाईन केलेली सुंदर वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या स्वप्नवत लग्नाचा लूक चाहत्यांना वेड लावणारा होता.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 8, 2023, 10:44 AM IST

मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या बहुचर्चित विवाह सोहळा अखेर थाटामाटात पार पडला. मंगळवारी संध्याकीळी दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिीत जैसमेरमधील सुर्यगढ पॅलेसमध्ये एकमेकांना पती पत्नी म्हणून स्वीकारले. नवविवाहित जोडपे सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी यांनी विवाहसोहळ्यातील त्यांचे फोटो पोस्ट केले आणि निःसंशयपणे त्यांनी त्यांच्या स्वप्नाळू लग्नाच्या फोटोंनी सर्वांची मने जिंकली आहेत.

विवाहप्रसंगी कियाराने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता, जो मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. नवविवाहित जोडप्याने विशेष प्रेमाने प्रेरित असलेल्या रोमन आर्किटेक्चरची कलाकुसरयुक्त भरतकामाची गुंफण डिझायनर मनिष मल्होत्राने लेहेंग्यात केली आहे. नवीन वधूने तिच्या आयुष्यातील या खास दिवसासाठी मनीष मल्होत्राची डायमंड ज्वेलरी निवडली. नेकपीसमध्ये दुर्मिळ झांबियन पन्नासह तयार केलेल्या अल्ट्रा-फाईन हँडकट हिऱ्यांची उत्कृष्ट रचना आहे. तिने हिऱ्याची सुंदर अंगठी घातलेली होती.

सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणीचा स्वप्नवत लग्नाचा लुक

दुसरीकडे, सिद्धार्थने एक उत्कृष्ट शाही चमक असलेली हस्तिदंती शेरवानी निवडली. शेरवानीमध्ये उत्कृष्ट स्वाक्षरी, हस्तिदंती धाग्याचे डिझाईन , सोन्याचे जरदोजी आणि बदला वर्क, अशी अत्यंत कुशलतेने हस्तकला वापरण्यात आली आहे. परफेक्ट रीगल लुकसाठी अत्यंत बारीक न कापलेल्या हिऱ्यांनी जडलेल्या पोल्की ज्वेलरीद्वारे त्याने आपला लूक पूर्ण केला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवणी या जोडप्याने हिंदू परंपरेनुसार लग्न केले. दिल्लीतील प्रसिद्ध 'जीआ' वेडिंग बँड मंगळवारी कार्यक्रमस्थळी दाखल झाला.

कियारा आणि सिद्धार्थ नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल तोंड उघडले नाही. त्यांनी डेटिंगच्या अफवा ना स्वीकारल्या ना नाकारल्या. 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'शेरशाह'च्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियारा प्रेमात पडले होते. या दोघांना अनेकदा एकत्र हँग आउट करताना दिसले ज्यामुळे त्यांच्या नात्यातील अफवांना आणखीनच भर पडली.

कॉफी विथ करण सीझन 7 च्या एका एपिसोडमध्ये, कियाराने खुलासा केला की ती लस्ट स्टोरीजच्या रॅप-अप पार्टीमध्ये सिद्धार्थला पहिल्यांदा भेटली होती. तिने कबूल केले की ती आणि सिद्धार्थ मल्होत्रा नक्कीच जवळच्या मैत्रिणी पेक्षा जास्त आहे. जेव्हापासून सिद्धार्थ आणि कियारा यांनी वर आणि वधू म्हणून त्यांचा लूक शेअर केला आहे, तेव्हापासून हे जोडपे किती आनंदी आणि सुंदर दिसत आहे हे पाहून चाहत्यांसह सेलेब्रिटीही भारावले आहेत.

सिद्धार्थ आणि कियाराचा शाही विवाह सोहळा
सिद्धार्थ आणि कियाराचा शाही विवाह सोहळा

करण जोहची भावूक चिठ्ठी - चित्रपट निर्माते करण जोहरने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले आहे व मनापासून एक चिठ्ठी लिहिली आणि लिहिले, 'मी त्याला दीड दशकांपूर्वी भेटलो होतो.... मूक, खंबीर आणि तरीही तितकाच संवेदनशील.... मी तिला खूप वर्षांनी भेटलो... मूक, खंबीर आणि तितक्याच प्रमाणात संवेदनशील...मग ते एकमेकांना भेटले आणि मला त्या क्षणी समजले की शक्ती आणि प्रतिष्ठेचे हे दोन खांब एक अतुट बंध बनवू शकतात आणि एकत्र सर्वात जादुई प्रेमकथा तयार करू शकतात.... त्यांना पाहणे ही एक परंपरा आणि कुटुंबात रुजलेली परी कथा आहे...मोहब्बतच्या मंडपात त्यांनी नवसाची देवाणघेवाण केली तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला त्यांच्या ह्रदयाची धडधड जाणवली...ऊर्जा वाटली...मी अभिमानाने, आनंदाने आणि फक्त त्या दोघांबद्दलच्या प्रेमाने उफाळून बसलो. मी तुझ्यावर प्रेम करतो सिड.... आय लव्ह यू की.... आजचा दिवस तुम्हाला सदैव जावो.... ' ( ANI )

हेही वाचा - Sidharth And Kiara Get Married : थाटामाटात पार पडला सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा विवाह सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.