मुंबई - Shilpa Shetty bring Bappa home : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालीय. रविवारी शिल्पा पती राज कुंद्रासह लालबाग येथे गणपती मूर्ती आणण्यासाठी गेली होती. दरवर्षी तिच्या घरी बाप्पाचे आगमन भक्तीपूर्ण वातावरणात होत असतं. गणेश उत्सवानिमित्य शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.

लालबाग येथे गणेश मूर्ती आणण्यासाठी पोहोचलेल्या शिल्पा शेट्टीला पापाराझींना गाठले. तिला फोटोसाठी विनंती केल्यानंतर तिने कॅमेऱ्याकडे पाहून पोजही दिली. यावेळी ती हिरव्या अनारकली सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

गणेश चतुर्थीचा उत्सव भारतभरासह महाराष्ट्रात विशेष उत्साहात साजरा होतो. हा लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे, यादिवशी भगवान गणेश आणि त्याची आई पार्वतीसह घरी राहायला येतात असा लोकांचा विश्वास असतो. त्यांच्या आगमाने एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं. यंदाच्या गणेशोत्सवाला 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 29 सप्टेंबरपर्यंत दहा दिवस हा उत्सव चालणार आहे.

कामाच्या आघाडीवर शिल्पा शेट्टी आगामी ‘सुखी’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी उत्सुक आहे. हा एक कौटुंबीक मनोरंजक चित्रपट आहे. पुरूष सत्ताक व्यवस्थेत पिचल्या जाणाऱ्या गृहिणीची भूमिका यात ती साकारत आहे. सुखी या चित्रपटातून सोनल जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि शिखा शर्मा यांनी केली आहे. राधिका आनंद हिने लिहिला असून याची पटकथा पाउलोमी दत्ताने लिहिलीय. सुखी चित्रपट 22 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय शिल्पा शेट्टी निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ओटीटी डेब्यू 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा -
१. Jawan OTT version : शाहरुख खान स्टारर 'जवान' लवकरच होणार ओटीटीवर प्रदर्शित...
२. Jaahnavi Kandula Death: जाह्नवी कंदुलाच्या मृत्यूवर प्रियांका चोप्रानी दिली प्रतिक्रिया....