मुंबई - अखेर सिनेमा हा एक व्यवसाय आहे आणि बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवर कोणीही वाद घालू शकत नाही. कार्तिक आर्यनचा शेहजादा मोठ्या पडद्यावर आला त्याचदिवशी शाहरुख खानच्या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत कमी करण्याचा निर्णय पठाणच्या निर्मात्यांनी घेतला आहे. खरंतर पठाण चित्रपटाशी टक्कर होऊ नये याची काळजी शेहजादाच्या निर्मात्यांनी घेतली होती. एक प्रकारे पठाणचा आदरच शेहजादाने केला होता. असे असताना पठाण चित्रपट अजूनही सुरू आहे हे समजू शकते पण शेहजादा न पाहता प्रेक्षकांनी पठाण चित्रपट पाहावा यासाठी तिकीटाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय अप्रिय समजला जात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शुक्रवारी यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर मल्टीप्लेक्सच्या राष्ट्रीय साखळीसाठी पठाण तिकिटांच्या किमती कमी झाल्याची घोषणा केली. याला पठाण दिवस असे संबोधून निर्मात्यांनी उघड केले की पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसमधील पठाण चित्रपटाचे सर्व शोमध्ये तिकिटे 110 रुपये फ्लॅट भावामध्ये विकली जातील. किंमतीतील घसरण सध्या फक्त एका दिवसासाठी आहे आणि मोठ्या पडद्यावर पठाणला अद्याप पाहू न शकलेल्या लोकांना आकर्षित करण्यासाठी ही मार्केटिंगची नवी चाल चांगली आहे.
-
Today is #PathaanDay 🎉 Witness the exciting combination of action + entertainment at your nearest big screen! Book tickets at ₹ 110/- flat* across all shows in India at @_PVRCinemas | @INOXMovies | @IndiaCinepolis and other participating cinemas! *T&C apply. pic.twitter.com/xNQAacErom
— Yash Raj Films (@yrf) February 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Today is #PathaanDay 🎉 Witness the exciting combination of action + entertainment at your nearest big screen! Book tickets at ₹ 110/- flat* across all shows in India at @_PVRCinemas | @INOXMovies | @IndiaCinepolis and other participating cinemas! *T&C apply. pic.twitter.com/xNQAacErom
— Yash Raj Films (@yrf) February 17, 2023Today is #PathaanDay 🎉 Witness the exciting combination of action + entertainment at your nearest big screen! Book tickets at ₹ 110/- flat* across all shows in India at @_PVRCinemas | @INOXMovies | @IndiaCinepolis and other participating cinemas! *T&C apply. pic.twitter.com/xNQAacErom
— Yash Raj Films (@yrf) February 17, 2023
विशेष म्हणजे कार्तिकच्या शेहजादाचे निर्माते प्रेक्षकांसाठी बंपर ऑफर घेऊन आले होते. टी-सीरीज, शेहजादाच्या मागे असलेले बॅनर सोशल मीडियावर एक तिकीट खरेदी करा, एक विनामूल्य ऑफर मिळवा अशी घोषणा करत आहे. या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी होतात का हे पाहणे मनोरंजक ठरेल. दरम्यान, शहजादाने भारतात ६.४ कोटी रुपयांची सलामी दिली आहे. कार्तिकच्या या चित्रपटात क्रिती सेनॉन आणि परेश रावल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कार्तिकच्या कारकिर्दीत शहजादाला महत्त्वपूर्ण स्थान आहे कारण या चित्रपटातून तो पहिल्यांदाच निर्माता म्हणून पदार्पण करत आहेले आणि ही त्याच्या स्टार पॉवरची एक प्रकारे परीक्षा मानली जाते आहे.
-
Today is #PathaanDay 🎉 Witness the exciting combination of action + entertainment at your nearest big screen! Book tickets at ₹ 110/- flat* across all shows in India at @_PVRCinemas | @INOXMovies | @IndiaCinepolis and other participating cinemas! *T&C apply. pic.twitter.com/xNQAacErom
— Yash Raj Films (@yrf) February 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Today is #PathaanDay 🎉 Witness the exciting combination of action + entertainment at your nearest big screen! Book tickets at ₹ 110/- flat* across all shows in India at @_PVRCinemas | @INOXMovies | @IndiaCinepolis and other participating cinemas! *T&C apply. pic.twitter.com/xNQAacErom
— Yash Raj Films (@yrf) February 17, 2023Today is #PathaanDay 🎉 Witness the exciting combination of action + entertainment at your nearest big screen! Book tickets at ₹ 110/- flat* across all shows in India at @_PVRCinemas | @INOXMovies | @IndiaCinepolis and other participating cinemas! *T&C apply. pic.twitter.com/xNQAacErom
— Yash Raj Films (@yrf) February 17, 2023
शेहजादा चित्रपटाकडून कार्तिक आर्यनला खूप अपेक्षा आहेत. चित्रपटाचे देशाविदेशात उत्तम प्रमोशन झाले असून सर्वत्र त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. कार्तिक हा युवा वर्गात खूप लोकप्रिय कलावंत आहे. त्याच्या प्यार का पंचनामा चित्रपटापासून तो तरुणांच्यात प्रचंड लोकप्रिय आहे. अलिकडच्या काळात त्याने अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट नाकारुन आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. दरम्यान अलिकडेच त्याचा भुल भुलैया हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून गेला होता. त्यामुळे शेहजादाही पुन्हा याच मार्गावरुन जाईल ही अपेक्षा आहे. आगाऊ बुकिंगला थोडा कमी प्रतिसाद मिळाला असला तरी शेहजादा पाहणारे त्याचे डाय हार्ड फॅन्स आहेत. शिवाय चित्रपट चांगला असेल तर माऊथ पब्लिसिटीचाही लाभ चित्रपटाला मिळू शकतो.
हेही वाचा - Swara Bhaskar Shahnaiwali Shaadi : रजिस्टर लग्नानंतर स्वरा भास्कर आणि फहाद अहमद करणार 'शहनाईवाली शादी'