मुंबई - गायिका अभिनेत्री शहनाज गिल सलमान खानच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटातून बाहेर पडल्याच्या अफवा सिनेजगतात पसरत आहेत. शहनाजला सलमानच्या चित्रपटातून बाहेर फेकण्यात आल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत असताना शहनाझ मात्र या सर्व बातम्यांकडे गंमत म्हणून पाहात आहे.
शहनाजने इंस्टाग्रामवर लिहिले की, "गेल्या काही आठवड्यांपासून या अफवा माझ्या रोजच्या मनोरंजनासाठी डोस आहेत. मी चित्रपट पाहण्यासाठी आणि अर्थातच मला देखील चित्रपटात पाहण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही."
शहनाजने या वर्षाच्या सुरुवातीला 'कभी ईद कभी दिवाली'चे शूटिंग सुरू केले होते. या चित्रपटात तिची जोडी राघव जुयालसोबत आहे. या चित्रपटातून तिचे बॉलिवूडमध्ये पदार्पणही होणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित 'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती आणि पूजा हेडगे यांच्या भूमिका आहेत. सलमानचा मेहुणा आयुष शर्माही या चित्रपटाचा एक भाग होता. मात्र, त्याने चित्रपटातून वॉक आऊट केल्याचे सांगण्यात येत आहे.
बिग बॉस 13 मधील तिच्या कार्यामुळे शहनाज प्रसिद्ध झाली. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तिने अनेक संगीत व्हिडिओंमध्ये काम केले. ती अखेरची दिलजीत दोसांझच्या 'होंसला रख'मध्ये दिसली होती. मे महिन्याच्या सुरुवातीला अभिनेत्री शहनाज, मुंबईत सलमानची बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी ईद पार्टीत दिसली होती.
शहनाज शिल्पा शेट्टीच्या टॉक शोमध्येही झळकली होती. आता सिद्धार्थ निगमची भूमिका असलेल्या 'कभी ईद कभी दिवाली'मध्ये ती कोणती भूमिका साकारते हे पाहायचे आहे.
हेही वाचा - बहिष्कार 'लाल सिंग चड्ढा' ट्रेंडबद्दल अखेर अक्षय कुमारने सोडले मौन