मुंबई - Shraddha Kapoor bought Lamborghini : शक्ती कपूरची मुलगी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं एक नवीन लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. श्रद्धा कपूरला कार खरेदी करण्याचा शौक आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये आता लॅम्बोर्गिनीचाही समावेश झाला आहे. श्रद्धानं लॅम्बोर्गिनी हुराकन टेक्निका ही दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घेतली आहे. या कारची किंमत 4 कोटी रुपये आहे. दरम्यान श्रद्धाचे काही लॅम्बोर्गिनीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शोरूममधील व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड सूटमध्ये दिसत आहे. तिनं केस मोकळे सोडले होते आणि कपाळावर बिंदी लावली होती. या फोटोमध्ये ती तिच्या नो मेकअप लूकमध्ये आहे. फोटोमध्ये ती खूप खास दिसत आहे.
श्रद्धा कपूरनं घेतली लॅम्बोर्गिनी कार : श्रद्धा कपूर ही तिच्या लॅम्बोर्गिनी नवीन कारसोबत पोझ देत आहे. याशिवाय तिची मैत्रिण पूजा चौधरी देखील तिच्यासोबत आहे. याआधी श्रद्धानं बीएमडब्लू (BMW) खरेदी केली होती, ज्याची किंमत 2.46 कोटी रुपये होती. याशिवाय तिच्याकडे मर्सिडीज बेंझ जीएलई आहे, ज्याची किंमत 1.01 कोटी रुपये आहे.
श्रद्धाच्या मित्रानं फोटो केले शेअर : फोटो शेअर करत, तिच्या मैत्रिणीनं इंस्टाग्रामवर लिहलं, 'आज माझ्यासाठी खरोखरच खास क्षण आहे. आम्ही हुराकन टेक्निकाला श्रद्धा कपूरपर्यंत पोहोचवण्याची तयारी करत असताना, मला या कंपनीसोबतचा माझा प्रवास आठवत आहे. हा माझा खास दिवस आहे, कारण या दिवशी आम्ही श्रद्धा कपूरला लॅम्बोर्गिनी विकली. सुप्परकार ही केवळ कार नसते, ती अडथळे तोडण्याचे आणि तुमची स्वप्ने निर्भयपणे जगण्याचे प्रतीक असते. उच्च कर्तृत्वाच्या स्त्रीकडे चाव्या सुपूर्द केल्याचा मला अभिमान वाटतो.
श्रद्धा कपूर दिली प्रतिक्रिया : या पोस्टवर प्रतिक्रिया देताना श्रद्धा कपूरनं कमेंट करत म्हटलं, 'या शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद.' या व्हायरल झालेल्या फोटोवर अनेकजण कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहे. श्रद्धा कपूर शेवटी 'तू झुठी मैं मकर'मध्ये दिसली होती. लव रंजनच्या या चित्रपटात श्रद्धा आणि रणबीर व्यतिरिक्त अनुभव सिंग बस्सी, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर हे कलाकार होते. ती सध्या अमर कौशिकच्या 'स्त्री 2' साठी शूटिंग करत आहे, ज्यामध्ये ती राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठीसोबत दिसणार आहे. मध्य प्रदेशातील चंदेरी येथे या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.
हेही वाचा :