ETV Bharat / entertainment

'इफ्फी' उद्घाटन समारंभात शाहिद कपूरनं केली 'कबीर सिंग' स्टाईलनं डॅशिंग बाइक एन्ट्री - Shahid Kapoor in IFFI 2023

Shahid Kapoor in IFFI 2023 : 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात उत्साहाने सुरुवात झाली. देश विदेशातून आलेल्या चित्रपट क्षेत्रातील पाहुण्यांसह चित्रपट प्रेमींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे. या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी अभिनेता शाहिद कपूरनं केली 'कबीर सिंग' स्टाईलनं डॅशिंग बाइक एन्ट्री करीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Shahid Kapoor in IFFI 2023
'इफ्फी' उद्घाटन समारंभात शाहिद कपूरची बाइक एन्ट्री
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 12:07 PM IST

पणजी (गोवा) - Shahid Kapoor in IFFI 2023 : गोव्यामध्ये 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यासाठी अभिनेता शाहिद कपूरनं आपल्या दमदार उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Shahid Kapoor in IFFI 2023
'इफ्फी' उद्घाटन समारंभात शाहिद कपूरची बाइक एन्ट्री

शाहीदनं त्याच्या ब्लॉकबस्टर 'कबीर सिंग' चित्रपटातील प्रसिद्ध 'वान्ना वाह वाह' या गाण्यावर बाइक चालवत कार्यक्रमस्थळी जबरदस्त एन्ट्री केली. काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या शाहिदनं त्याच्या नृत्यानं उपस्थितांना मोहित करुन सोडलं. त्याच्या 'मौजा ही मौजा' या लोकप्रिय गाण्यापासून 'धटिंग नाच' आणि 'शाम शहर' पर्यंत अनेक चार्टबस्टर्समध्ये लीलया प्रवेश केला. त्याचा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांना आनंद देणारा ठरला.

स्टेजवर येण्यापूर्वी शाहिदने रेड कार्पेटवर धडाकेबाज हजेरी लावली आणि मीडियाशी थोडक्यात संवाद साधला. तो म्हणाला,"इफ्फीमध्ये आल्याने मी खूप आनंदीत आहे आणि परफॉर्म करण्यास उत्सुक आहे. गोवा हे माझे आवडतं ठिकाण आहे."

भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंकज त्रिपाठीच्या आगामी चित्रपट 'कडक सिंग'च्या ट्रेलरचे लॉन्चिंग करण्यात आलं. मोठ्या प्रमाणावर सेलेब्रिटी उपस्थित असलेल्या या सोहळ्याच्या दरम्यान सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन'च्या मोशन पोस्टरचे लॉन्चिंगही करण्यात आले. इफ्फी 2023 च्या उद्घाटन समारंभातील इतर उल्लेखनीय उपस्थितांमध्ये अभिनेत्री श्रिया सरन, नुसरत भरुचा, सारा अली खान, विजय सेतुपती, सनी देओल, करण जोहर, श्रेया घोषाल आणि सुखविंदर सिंग यांचा समावेश होता.

दरम्यान, चित्रपटाच्या आघाडीवर शाहिद कपूर आगामी 'देवा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. पूजा हेगडेसोबत भूमिका असलेला त्याचा हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांच्या मतानुसार 'देवा' एका हाय प्रोफाइल प्रकरणाचा तपास करणार्‍या एका हुशार पण बंडखोर पोलिस अधिकाऱ्याची कथा आहे.

'देवा'शिवाय शाहिदकडे क्रिती सेनॉनसोबत एक अद्याप शीर्षक न ठरलेला चित्रपट आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल. चित्रपटाच्या पहिल्या लूकमध्ये हे दोन्ही कलाकार एका बीचवर बाईकवर समोरासमोर बसलेले दिसले आहेत.

हेही वाचा -

1. 'टीव्ही क्वीन' एकता कपूर आणि कॉमेडियन वीर दासनं एमी अवॉर्ड्स जिंकून रचला इतिहास

2. 'टायगर 3' च्या यशाबद्दल सनी देओलनं केलं सलमान खानचं अभिनंदन

3. सलमान खानची भाची अलिझेला `फर्रे' बाबत वाटतेय 'अन्गझाइटमेन्ट'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.