मुंबई - 'द फॅमिली मॅन' च्या गाजलेल्या यशानंतर, राज आणि डीके यांनी त्यांच्या 'फर्जी' या मालिकेद्वारे आणखी एक पराक्रम केला आहे. ओरमॅक्स मीडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 'फर्जी' या वेब सिरीजला आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली जाणारी भारतीय मालिका घोषित करण्यात आली आहे. शाहिद कपूर आणि विजय सेतुपती स्टारर 'फर्जी' ने 37.1 दशलक्ष दर्शकांची नोंद केली आहे
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
त्याच्या इंस्टा-फॅमिलीसह बातम्या शेअर करताने शाहिदने डेटा आणि तपशील उघड करणारी एक पोस्ट शेअर केली. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'फर्जी फीवर...तुमचे खूप खूप आभार.' राज आणि डीके यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर, 'आपल्या सर्वांचे आभार... सर्वांच्या प्रेमासाठी!! अशी पोस्ट शेअर केली आहे.' 'फर्जी' मध्ये चतुरसत्र अभिनेते शाहिद कपूर, विजय सेतुपती, राशि खन्ना, के के मेनन, भुवन अरोरा, रेजिना कॅसांड्रा आणि अमोल पालेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या मालिकेची कथा कॉन कलाकार सनी (शाहिदने साकारलेली) च्या आयुष्याभोवती फिरते, जो एक परिपूर्ण कॉन तयार करत असताना गुन्हागेरीकडे वळतो. त्याचे प्रत्येक पाऊल धोक्याच्या दिशेने पडत जाते. त्याचवेळी अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावलेल्या टास्क फोर्स अधिकाऱ्याशी (विजय सेतुपतीने भूमिका बजावली आहे) त्याचा सामना होतो.
सनी हा कमालीचा पेंटर आहे. झटपट कमाईसाठी तो आपल्या अंगभूत चित्रकलेचा वापर हुबेहुब नकली नोटचे डिझाईन बनवण्यासाठी करतो. आजोबांचे महत्त्वकाक्षी विचार प्रसारित होणाऱ्या वर्तमानपत्राच्या छापखान्यात तो चक्क खोट्या नोटा छापण्याचे साहस करतो. यामुळेच त्याचा गुन्हेगारी जगताशी संबंध आणि संपर्क वाढतो. पुढे जाऊन त्याचा संपर्क आंतरराष्ट्रीय टोळीशी येतो आणि तो त्यासाठी नोटांचे डिझाईन बनवतो. पहिल्या एपिसोडपासून उत्कंठा वाढवणारी ही मालिका उत्तरोत्तर रंगतदार बनते.
राज आणि डीके या प्रशंसनीय दिग्दर्शक जोडीने दिग्दर्शित केलेला, क्राइम थ्रिलर शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांच्या डिजिटल पदार्पणासाठी ओळखला जात आहे. मालिकेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर मुख्य कलाकारांनी मालिकेचा दुसरा सीझन पक्का केला आहे.