ETV Bharat / entertainment

SRK's in bald look : शाहरुखच्या बाल्ड लूकवर फॅन्स फिदा, पोस्टवर प्रेमाचा वर्षाव

author img

By

Published : Jul 13, 2023, 3:06 PM IST

शाहरुख खानने आपल्या आगामी जवान चित्रपटातील बाल्ड लूकसह नवीन पोस्टर पोस्ट केले आहे. त्याचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसते. त्याच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव सुरू झालाय.

SRK's in bald look
शाहरुखच्या बाल्ड लूकवर फॅन्स फिदा

मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आपल्या आगामी जवान चित्रपटामुळे खूप उत्साहित झाला आहे. या चित्रपटासाठी तो त्याच्या फॅन्स इतकाच एक्सायटेड बनलाय. जवान चित्रपटाचा प्रीव्ह्यू रिलीज झाल्यानंतर त्याचा चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमामुळे त्याला आकाश ठेंगणे वाटू लागलंय. स्वतः शाहरुख खानलाच या चित्रपटाची प्रतीक्षा करणे जड वाटू लागलंय. सध्यातर तो आपल्या चाहत्यांच्या उत्तम संपर्कात राहायचा प्रयत्न करत असून जवानचे अनुभव तो शेअर करताना दिसतो. या दरम्यान त्याने जवान चित्रपटातील आपल्या टकल्या लूकचे नवे पोस्टर जारी केलंय.

शाहरुख खानने ही पोस्ट वेगवेगळ्या भाषेमध्ये शेअर केली आहे. त्याने लिहिलंय की, 'मी जेव्हा व्हलेन होतो तेव्हा माझ्य समोर कोणीही हिरो टिकू शकत नाही.' या पोस्टरवर शाहरुख बाल्ड लूकमध्ये झळकलाय. त्याने हातात पिस्तुल पकडली असून डोळ्यावर चष्मा घातलाय. शाहरुखच्या या बाल्ड लूकवर चाहत्यांनी प्रेमाचा पाऊस पाडायला सुरुवात केलीय. एकाने लिहिलंय की, हे तर मास पोस्टर आहे. त्याने पोस्टर शेअर करुन काही वेळच झाला असून लाखो लोकांनी हे पोस्टर आवडल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

जवान या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचा मास्टर दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ एटली कुमारने केले आहे. एटलीच्या कारकिर्दीतील आजपर्यंतचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. जवान हा त्याचा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटाचा प्रीव्ह्यू रिलीज करण्यात आला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होणार याचा संकेत यातून मिळत आहेत. ७ सप्टेंबर रोजी जवान देश विदेशात रिलीज केला जाईल. या चित्रपटात किंग खान शाहरुखसह नयनतारा, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, विजय सेतुपती आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणीचीही भूमिका असणार असल्याचे बोलले जात आहे.

पठाण चित्रपटामुळे शाहरुख खानचा वनवास खऱ्या अर्थाने संपला. चार वर्षानंतर त्याने पहिल्यांदा बॉक्स ऑफिसवर यश मिळवले होते. जवान हा चित्रपटही पठाणच्या विक्रमाशी बरोबरी करु शकतो, असा विश्वास शाहरुख आणि त्याच्या चाहत्यांना वाटतोय. राजकुमार हिराणीच्या डंकी या आगामी चित्रपटाचीही प्रतीक्षा चाहत्यांना लागून राहिली आहे.

हेही वाचा -

१. OMG 2 : अक्षय कुमारचा चित्रपट 'ओ माय गॉड २' वादाच्या भोवऱ्यात, सेन्सॉर बोर्डची समिती करणार परीक्षण

२. classic Bollywood films remake : बावर्ची, मिली आणि कोशिश या १९७० मधील क्सासिक चित्रपटांचा होणार रिमेक

३. Nandita Das' Zwigato in Oscar Library: 'झ्विगाटो'ला ऑस्कर लायब्ररीमध्ये स्थान मिळाले, भारतीयांना अभिमान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.