मुंबई - शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाबद्दलची क्रेझ जबरदस्त आहे. आता या चित्रपटातील 'जिंदा बंदा' हे गाणे रिलीज होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. हे एक समुह सेलेब्रिशनचे धमाकेदार गाणे असणार असल्याची खात्री निर्मात्यांकडून दिली जात आहे.
![SRK first song Zinda Banda](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/26-07-2023/19101401_srk-song.jpg)
हे गाणे भव्य प्रमाणावर चेन्नईमध्ये शूट करण्यात आले आहे. पाच दिवस चाललेल्या या शुटिंगसाठी देशभरातील मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बंगलोर आणि मदुराई या शहरातून १००० डान्सर्स सहभागी झाले होते. या गाण्यावर तब्बल १५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 'जिंदा बिंदा' नेत्रदीपक गाण्यावर शाहरुख खानने हजारो मुलींच्यासह अभूतपूर्व डान्स सादर केला आहे. अनिरुद्ध यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याची कोरिओग्राफी शोबी यांनी केली आहे. हा देशाला आनंद देणारा ट्रॅक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाणार आहे.
![SRK first song Zinda Banda](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/26-07-2023/19101401_srk-song1.jpg)
'जवान' चित्रपटाच्या प्रीव्ह्यू ट्रेलरमध्ये आपण किंग खानची डान्स करतानाची एनर्जेटिंक झलक पाहिली होती. किंग खान बेभान होऊन नाचताना यात दिसला होता. ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित राजा कुमारीने गायलेल्या गाण्यावर तो थिरकला होता. या गाण्यातील अनिरुद्ध रविचंदरचे ताल धरायला लावणारे संगीत आकर्षक होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'जवान' हा शाहरुख खानचा २०२३ मधील दुसरा सर्वात मोठा रिलीज होणारा चित्रपट आहे. 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. शाहरुखच्या आयुष्यातील सर्वोत मोठा हिट चित्रपट 'पठाण' ठरला होता. चारवर्षाच्या विश्रांतीनंतर तो 'पठाण'मधून बॉलिवूडमध्ये परतला होता.
अॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' चित्रपटात शाहरुखची पहिल्यांदाच नयनतारासोबत जोडी आहे. यात विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत असून दीपिका पदुकोणही कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर रोजी देशात आणि परदेशात रिलीज होणार आहे.
हेही वाचा -