ETV Bharat / entertainment

Jawan trailer at Burj Khalifa : शाहरुखच्या 'जवान' ट्रेलरचे बुर्ज खलिफावर लॉन्चिंग, टकलू अवतार पाहण्याचे किंग खानचे आवाहन - शाहरुख खान

Jawan trailer at Burj Khalifa : दुबईच्या बुर्ज खलिफा बिल्डिंगवर अखेर शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या भव्य सोहळ्या दरम्यान किंग खानने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटातील वेगवेगळ्या लूकबद्दल शाहरुख यावेळी बोलताना दिसला.

Jawan trailer at Burj Khalifa
शाहरुखच्या 'जवान' ट्रेलरचे बुर्ज खलिफावर लॉन्चिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 12:29 PM IST

Updated : Sep 1, 2023, 2:33 PM IST

मुंबई - Jawan trailer at Burj Khalifa सुपरस्टार शाहरुख खानने गुरुवारी दुबईच्या बुर्ज खलिफा या आयकॉनिक इमारतीवर 'जवान'चा ट्रेलर लॉन्च करुन सर्वांचे डोळे दीपवले. या इमारतीवर त्याने 'जवान'चा तीन मिनीटांचा व्हिडिओ लॉन्च केला आणि खूप काळाची लोकांची प्रतीक्षा संपवली. चेन्नईत पार पडलेल्या भव्य प्री लॉन्चिंग कार्यक्रमानंतर शाहरुखने दुबईतील आयकॉनिक बुर्ज खलिफा इमारतीवर ट्रेलर लाँच केला आहे.

या ट्रेलर लॉन्च प्रसंगी शाहरुख खानने 'जिंदा बंदा' गाण्यावर ताल धरला. या सोहळ्यात 'चलेया' गाण्याचे अरबी व्हर्जनही लॉन्च करण्यात आले. या कार्यक्रमात शाहरुख खानने चाहत्यांशी संवाद साधताना आपली आयकॉनिक पोझही दिली. 'जवान' चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे भरपूर पॅकेज असल्याचे त्याने सांगितले.

'जवान' चित्रपटात सहा वेगवेगळ्या लूकमध्ये शाहरुख खान दिसला आहे. यात एका लूकमध्ये तो टक्कल केलेला दिसत आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, ही पहिली आणि अखेरची वेळ असेल. त्याचा टकलू अवतार पाहण्यासाठी चित्रपट पाहण्याचे आवाहनही त्याने केले.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

शाहरुख खान म्हणाला, 'या चित्रपटात माझे टक्कल देखील आहे. जसा की मी नाही, आणि मला तसे बनायचेही नाही. टक्कल करण्याची ही माझी पहिली आणि अखेरची वेळ असेल. तुमच्यासाठी मी टक्कलू पण झालोय. कुणाची तरी इज्जत राखण्यासाठी तरी जा. काय माहिती मी पुन्हा तुम्हाला असा टक्कलू दिसेल की नाही.' ( असे तो हिंदीत म्हणाला. )

दरम्यान जवान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोणताही वाद होणार नाही याची काळजी घेत या चित्रपटाची निर्मिती झाल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट दिसत आहे. उत्तम संवाद, जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स, दमदार संगीत आणि नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण अशी तगडी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर रोजी जगभरातील थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा अ‍ॅक्शन ड्रामा हिंदी, तमिळ आणि तेलुगूसह इतर भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

हेही वाचा -

१. Jawan Advance Booking : निवडक थिएटर्समध्ये १५ मिनीटात संपली जवान अ‍ॅडव्हान्स बुकिंगची तिकीटे, तिकीट खिडकीवर नोटांचा पाऊस

२. An end to Seema Haider speculations : बिग बॉस आणि कपिल शर्मामध्ये जाणार नसल्याचा सीमा हैदराचा खुलासा

३. Jawan Trailer SRK Dialogue : 'बेटे को हाथ लगाने से पहले...', शाहरुखच्या डायलॉगवर लोक म्हणतात, समझदार को इशारा काफी है!

Last Updated : Sep 1, 2023, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.