ETV Bharat / entertainment

Shah Rukh Khan : शाहरुख खान अमेरिकेतून भारतात परतला ; मुंबई विमानतळावर झाला स्पॉट - अमेरिकेतून भारतात परतला

शाहरुख खान बुधवारी पहाटे मुंबई विमानतळावर अमेरिकेतून भारतात परतला आहे. याआधी शाहरुखला अमेरिकेत नाकाला दुखापत झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र विमातळावर शाहरुख हा नेहमीप्रमाणेच देखणा दिसत होता.

Shah Rukh Khan
शाहरुख खान
author img

By

Published : Jul 5, 2023, 11:10 AM IST

मुंबई : अभिनेता शाहरुख खान बुधवारी पहाटे मुंबई विमानतळावर अमेरिकेतून भारतात परतला. याआधी शाहरुखला अमेरिकेत दुखापत झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. विमातळावर किंग खान नेहमीप्रमाणेच देखणा दिसत होता आणि त्याने निळ्या रंगाची स्वेटशर्ट हुडी परिधान केले होती. यासोबतच त्याने हुडीच्या आता एक पांढरी टी-शर्ट घातली होती. याशिवाय त्याने पांढऱ्या रंगाचा पॅंट परिधान केला होता. या लूक आणखी खास बनविण्यासाठी त्याने काळ्या रंगाची टोपी आणि सनग्लास घातला होता. या लूकमध्ये तो फार देखणा दिसत होता. लॉस एंजेलिसमध्ये एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान शाहरुखच्या नाकाला दुखापत झाली होती. , मिळालेल्या माहितीनुसार त्यानंतर शाहरुख तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यात आले होते.

गौरी खान दिसली मुंबई विमातळावर : दरम्यान, शाहरुख खानची पत्नी गौरी आणि मुलगा अबराम खान देखील मुंबई विमानतळावर दिसले होते. आई-मुलाची जोडी हातात हात घालून चालताना आणि मस्ती करताना दिसली. गौरीने प्रिंटेड ब्लू फ्लोरल ड्रेस घातला होता यावर तिने ब्लॅक ब्लेझरसह काळ्या रंगाची हँडबॅग घेतली होती. याशिवाय तिने सनग्लास देखील घातला होता. तसेच यावेळी मुलगा अबराम हा कॅज्युअल लूकमध्ये गोंडस दिसत होता.

चित्रपटसृष्टीत ३१ वर्षे पूर्ण केली : शाहरुख खानला, बॉलिवूडमध्ये 'रोमान्सचा राजा' म्हणून संबोधले जाते, निःसंशयपणे त्याच्या असंख्य रोमँटिक चित्रपटांद्वारे तो जगभरातील लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. शाहरुखने विविध शैलींमध्ये अनेक पात्रांची भूमिका साकारली आहे, परंतु त्याने रोमँटिक चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. तसेच शाहरुखने असंख्य रोमँटिक आणि कॉमेडी सिनेमा चित्रपटसृष्टीला दिले आहेत, ज्या आता क्लासिक बनल्या आहेत. शाहरुखने २५ जून रोजी बॉलीवूडमध्ये ३१ वर्षे पूर्ण केली आहे.

शाहरुख या दोन चित्रपटामध्ये दिसणार प्रमुख भूमिकेत : या वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या सिद्धार्थ आनंदच्या ब्लॉकबस्टर अ‍ॅक्शन-थ्रिलर 'पठाण' या चित्रपटाद्वारे शाहरुखने पुन्हा वरचे स्थान प्राप्त केले. तो लवकरच 'जवान' आणि 'डंकी'मध्ये दिसणार आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित, 'जवान' ६ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्याही भूमिका आहेत. तसेच शाहरुख हा अभिनेता सलमान खानच्या टायगर ३ मध्ये देखील एक छोटी भूमिका साकारणार आहे, त्यानंतर तो राजकुमार हिरानीच्या 'डंकी'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.'डंकी' या चित्रपटात त्याच्यासोबत तापसी पन्नू दिसणार आहे. पहिल्यांदाच शाहरुख आणि तापसी एकत्र काम करणार आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Akanksha Puri questions : सलमानच्या माफीनंतर आकांक्षा पुरीचा हल्ला बोल, म्हणते - तो भाग 'हॉटेस्ट लिप-किस' म्हणून का प्रमोट केला?
  2. DARA SINGH SON VINDU DARA SINGH : आदिपुरुषमधील हनुमानजींच्या पात्रावर दारा सिंहचा मुलगा संतापला
  3. Rocky Aur Rani Kii Prem Kahani trailer: करण जोहरच्या रोमँटिक ड्रामामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा पॉवर हाऊस परफॉर्मन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.