मुंबई - बॉलिवूडचा किंग खानच्या घरातील 'मन्नत'मधून त्याची नवी नेमप्लेट गायब झाली आहे. नेमप्लेटची किंमत सुमारे 25 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याचे कारणही आश्चर्यकारक आहे. शाहरुख खानच्या घरची नवी प्लेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. शाहरुखचे चाहते हे जोरदार शेअर करत होते. रोज शेकडो चाहते या नेमप्लेटपुढे उभा राहून सेल्फी घेत असत.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखची पत्नी गौरी खानने डिझाइन केलेल्या नेमप्लेटमधून एक हिरा पडला आहे. त्यामुळे नेमप्लेट दुरुस्तीसाठी काढण्यात आली आहे. नेमप्लेट बरोबर झाली की ती पुन्हा लावली जाईल. शाहरुख खानचे घर मुंबईतील वांद्रे भागात आहे. शाहरुख खानने नुकतीच आपल्या घराची नेम प्लेट बदलली होती. मन्नतची नेमप्लेट शाहरुखची पत्नी गौरी खानने डिझाईन केली आहे. एवढेच नाही तर संपूर्ण घराची रचना गौरीने केली असून घर कसे सजवायचे हेही ती ठरवते. विशेष म्हणजे किंग खान या गोष्टींमध्ये अजिबात ढवळाढवळ करत नाही.
दुसरीकडे, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. बऱ्याच दिवसांनी तो 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे. यशराज बॅनरखाली 'पठाण' चित्रपटाची निर्मिती होत आहे. जो 25 जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. याशिवाय तो राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या चित्रपटातही दिसणार आहे.
हेही वाचा - रणदीप हुडा अभिनीत 'स्वातंत्र्य वीर सावरकर' फर्स्ट लूक आऊट