ETV Bharat / entertainment

SRK injured in US: शाहरुख खानचा अमेरिकेत शूटिंगदरम्यान अपघात, शस्त्रक्रियेनंतर परतला मायदेशी - शाहरुख खान लॉस एंजेलिसमध्ये

सुपरस्टार शाहरुख खानला सेटवर झालेल्या अपघातादरम्यान नाकाला दुखापत झाली. शाहरुख खान लॉस एंजेलिसमध्ये एका अज्ञात प्रकल्पासाठी शूटिंग करत असताना ही अप्रिय घटना घडली.

SRK injured in US
सुपरस्टार शाहरुख खान
author img

By

Published : Jul 4, 2023, 1:49 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला अमेरिकेत शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. दिुखापतीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. किंग खान लॉस एंजेलिसमध्ये एका अज्ञात प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर शाहरुख खान भारतात परतला आहे.

शाहरुख खान अपघातातून बचावला - शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी जवान चित्रपटाच्या ट्रेलर लाँचची आतुरतेने वाट पाहत असताना, अमेरिकेत तो अज्ञात चित्रपटासाठी शूट करत होता. अनेक वेबलॉइड्सवर ही बातमी झळकली आहे. हाती आलेल्या बातमीनुसार लॉस एंजेलिसमध्ये एसआरके एका किरकोळ ऑन-सेट अपघातातून बचावला. अपघातादरम्यान शाहरुखच्या नाकाला दुखापत झाली होती आणि त्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागली होती. आता शाहरुख बरा होण्याच्या मार्गावर असल्यामुळे एसआरकेच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

शस्त्रक्रियेनंतर घरी परतला शाहरुख - एसकेआरला सेटवर अपघात कसा झाला यासंबंधीचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. त्याच्या नाकाला दुखापत झाल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शाहरुखच्या टीमला डॉक्टरांनी सांगितले की काळजी करण्यासारखे काही नाही. किरकोळ शस्त्रक्रियेनंतर, शाहरुख खान त्याच्या नाकावर पट्टी बांधलेला दिसला. खानच्या टीमने त्याच्या प्रकृतीबद्दल अधिकृत निवेदन जाहीर केलेले नसले तरी तो मुंबईत घरी परतला असून आता तो बरा आहे.

जवानचा ट्रेलर मिशन इम्पॉसिबलसोबत - दरम्यान, शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित जवान ट्रेलर टॉम क्रूझच्या मिशन: इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट वनला जोडला जाईल. हा चित्रपट १२ जुलै रोजी भारतात रिलीज होत आहे. अटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटात तमिळ सुपरस्टार नयनतारा आणि विजय सेठीपाठी देखील आहेत. जवान ७ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

जवान आणि डंकीची प्रतीक्षा सुरू - २०१८ मध्ये रिलीज झालेल्या झिरो चित्रपटाला अपयश आल्यानंतर शाहरुख खान रुपेरी पडद्यापासून बराच काळ लांब राहिला. अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळत असल्याने त्याला आता एका हुकमी हिट चित्रपटाची प्रतीक्षा होती. त्यानंतर त्याने पठाण चित्रपट स्वीकारला. यासाठी खूप मेहनत त्याने घेतली आणि त्याचा परिणाम आपण पाहिला. या दरम्यान त्याने यशस्वी दिग्दर्शकांसोबतच काम करण्याचा निर्णय घेतला. यापैकी अटलीसोबत जवान आणि राजकुमार हिराणीसोबत डंकी तो बनवत आहे. अटली आणि हिराणी हे दोघे असे दिग्दर्शक आहेत, ज्यांचा आजवर एकही चित्रपट अपयशी ठरलेला नाही. त्यामुळे शाहरुखचे चाहते या दोन्ही चित्रपटांची मोठी प्रतीक्षा करत आहेत.

हेही वाचा -

१. SatyaPrem Ki Katha News : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईची बॉक्स ऑफिसवर घसरण...

२. MR AND MRS MAHI : जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'मिस्टर अँड मिस्टर माही' २०२४ला होणार प्रदर्शित

३. Mrunal Thakurs first look : नानी ३० मधील मृणाल ठाकूरच्या फर्स्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.